Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; किती स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल? नवीनतम दर तपासा

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rate : गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दोन कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 4 डॉलरने घसरल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. आज एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये दर बदलले आहेत.(Latest Marathi News)

यूपीच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) जिल्ह्यात आज सकाळी पेट्रोल (Petrol) 27 पैशांनी स्वस्त स्वस्त झाले असून 96.65 रुपये प्रति लिटर झाले आहे. येथे आज डिझेल (Diesel) 26 पैशांनी घसरल्यानंतर 89.82 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 32 पैशांनी महागले असून ते 96.58 रुपये प्रति लीटरवर पोहोचले, तर डिझेल 30 पैशांनी वाढले असून ते 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT