Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येणार

Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा देखील समावेश राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji MaharajSaam TV

रणजीत माजगावकर

Kolhapur News: छत्रपती संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येणार आहे.राज्य सरकारने तीन छायाचित्रांसह कागदपत्रांची माहिती मागवली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत मान्यताप्राप्त छायाचित्र लवकरच समोर येणार आहे. संभाजी महाराजांचे छायाचित्र निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर उपलब्ध होईल. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhaji Maharaj
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

छत्रपती संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भात तीन छायाचित्रांसह कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून राष्ट्रपुरुषांसह महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या जातात. यावर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा देखील समावेश राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

मात्र, राज्य सरकारकडून आतापर्यंत संभाजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता ते छायाचित्र आता लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. (Breaking Marathi News)

Chhatrapati Sambhaji Maharaj
Sushma Andhare on CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना, सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट

त्यासाठी कोल्हापूरसह सातारामधून छत्रपती संभाजी महाराजांच्या छायाचित्राच्या तीन प्रती आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वंशजांना राज्य सरकारकडून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com