Chhattisgarh News: लग्नात भेटवस्तू म्हणून मिळालेल्या होम थिएटर म्युझिक सिस्टीममध्ये स्फोट झाल्याने नवरदेवाचा आणि त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची दुखःद आणि दुर्देवी घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कबीरधाम जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका मुलासह चार जण जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. लग्नाच्या दोनच दिवसांनंतर हा दुर्दैवी प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, चामरी गावात राहणाऱ्या हेमेंद्र मेरावीचा विवाह अंजना गावातील एका तरुणीशी दोनच दिवसांपूर्वी झाला. लग्नात मिळालेल्या भेटवस्तू सोमवारी उघडल्या जात होत्या. एका बॉक्समध्ये होम थिएटर सिस्टिम होती. ती वाजवून पाहताना दुर्दैवी घटना घडली. होम थिएटर प्लगला जोडताच मोठा स्फोट झाला आणि घराच्या भिंती कोसळून पडल्या.
रेंगाखार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चामारी गावात सोमवारी ही घटना घडली असून स्फोटाचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्फोटामुळे होम थिएटर असलेल्या खोलीच्या भिंती आणि छत कोसळले असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
कबीरधामच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा ठाकूर यांनी सांगितले की, हेमेंद्र मेरावी (22) यांचे या महिन्याच्या 1 तारखेला लग्न झाले होते. सोमवारी हेमेंद्र आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या घरातील एका खोलीत लग्नात मिळालेल्या भेटवस्तू उघडत होते. यामध्ये एक होम थिएटरही होता. नवरदेव हेमेंद्रने इलेक्ट्रिक बोर्डला वायर जोडून म्युझिक सिस्टम चालू करताच त्याचा स्फोट झाला.
या घटनेत हेमेंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ राजकुमारनं रुग्णालयात उपचारादरम्यान जीव सोडला. राजकुमार स्फोटात गंभीर जखमी झाला होता. कवर्धा जिल्ह्यातील रेंगाखार परिसरात नक्षल्यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे या स्फोटामागे काही घातपात होता का त्याचा शोध पोलीस घेत आहेत. (Crime News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.