Chattisgarh Politics  Saam Digital
देश विदेश

Chattisgarh Politics :तर छत्तीसगडमध्ये जातनिहाय जनगणना करू ; प्रियंका गांधी यांची घोषणा

Congress Campaign Meeting at Kanker: कांकेर येथे प्रचारसभेत भाजप मोदींवर टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येताच बिहारसारखी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कांकेर येथे आयोजित सभेत केली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. भाजपवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहणे एवढाच भाजपचा उद्देश आहे. त्याचे सहकारी मोठे मोठे उद्योगपती आहेत आणि भाजपवाले केवळ त्यांच्यासाठीच काम करतात, असा घणाघाती आरोप त्यांनी भाजपवर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही केली टीका

बेरोजगारी आणि महागाईने कळस गाठला आहे, मात्र पंतप्रधानाना याचं काही पडलेलं नाही. काँग्रेसने अनेक राम पथ गमन बनवले आणि त्यांना पर्यटन स्थळांचा दर्जा दिला. प्रभू राम जिथे जिथे गेले त्या ठिकांणांनाही पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात आला. महात्मा गांधीपासून राजीव गांधी पर्यंतच्या सर्वांचं पंचायत राजचं स्वप्न होतं, ते काँग्रेसने पूर्ण केल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या.

पंचायतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण ही काँग्रेसची देण

पंचायतींमधून महिलांना ३३ टक्के आरक्षण ही काँग्रेसची देण आहे. एक वेळ अशी होती की, लोकप्रतिनिधींची संख्या खूप कमी होती. सर्व छोटे मोठे निर्णय एका ठिकाणी केंद्रीत होते. मात्र पंचायत राजमुळे लोकशाही गावागावपर्यंत पोहोचली, महिलांना सशक्त करण्याचं काम काँग्रेसने केलं आणि आज आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जात आहेत. भाजप गरिबांची संपत्ती श्रीमंताना देण्याचं काम करत आहे.

'काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये शेतकरी सुखी'

आज केंद्राच्या धोरणांमुळे गरीब आणि महिला अडचणीत आहेत. देशभरातील शेतकरी चिंतेत आहे, मात्र छत्तीसगड मधील शेतकरी सुखी आहे, कारण काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी खूप काम केलं आहे. तसेच काँग्रेसची जिथे जिथे सत्ता आहे तिथे तिथे काँग्रेसने गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे. जर काँग्रेसची सत्ता पुन्हा आली तर १० लाख गरिबांना घरे देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT