ISRO Launch Saam TV
देश विदेश

Chandrayaan-3 Launch date : अवघा देश वाट पाहत असलेल्या चंद्रयान-3 ची तारीख ठरली; इस्रो प्रमुखांची मोठी घोषणा

Chandrayaan-3 Launch : चंद्रयान - 2 च्या अपयशानंतर चांद्रयान - 3 मिशन सुरु करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chandrayaan-3 Launching Date: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISROने आपल्या चंद्रयान 3 मिशनची घोषणा केली आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या जुलै महिन्यात चंद्रयान 3 मिशनला सुरु केली जाणार आहे, असं एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे.

चंद्रयान - 2 च्या अपयशानंतर चंद्रयान - 3 मिशन सुरु करण्यात येणार आहे. चंद्रयान-3 हे चंद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3 द्वारे यांचं लॉन्चिंग केले जाईल.

एस सोमनाथ यांनी चंद्रयान मिशनच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटलं की, आजचे यश GSLV F10 च्या अपयशानंतर आले आहे. क्रायोजेनिक स्टेजमधील सुधारणा आणि अपयशातून घेतलेल्या धड्याचा खरोखरच फायदा झाला आहे. समस्या सोडवण्याचे श्रेय त्यांनी 'फेल्युअर अॅनालिसिस कमिटी'ला दिले.

इस्रोच्या वैज्ञानिकांनी आज जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलद्वारे नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 लाँच केला. आज सकाळी 10.42 वाजता ते आपल्या लक्ष्याच्या दिशेने रवाना झाले. अंतराळ क्षेत्रातील भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल, असंही एस सोमनाथ म्हणाले. (Latest News Update)

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, भारताकडे 7 NavIC उपग्रह आहेत. यापैकी केवळ 4 कार्यरत आहेत तर 3 खराब झाले आहेत. आपण तिन्ही बदलले तर तोपर्यंत हे चारही निरुपयोगी होतील. म्हणूनच आम्ही पाच नेक्स्ट जनरेशन उपग्रह NVS सोडण्याची तयारी सुरु केली आहे.. NVS-01 यापैकी एक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT