Chandrayaan 3 vs Luna 25 Saamtv
देश विदेश

Chandrayaan 3 vs Luna 25: उशिरा सोडूनही चांद्रयान- 3 आधीच चंद्रावर पोहोचणार लुना-25; भारत- रशिया चांद्रयान मोहिमांमध्ये फरक काय?

Chandrayaan 3 vs Luna 25 Explanation: भारत आणि रशियाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमा एकमेकांपासून कशा वेगळ्या आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.

Gangappa Pujari

Luna 25 Launch: भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले. त्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर, 11 ऑगस्ट रोजी रशियाने आपली चंद्र मोहीम 'लुना-25' प्रक्षेपित केली. रशियाचं मिशन लुना-25 या महिन्यात 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकतं. तर भारताचं चांद्रयान-3 दोन दिवसांनंतर म्हणजेच, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचणार आहे. भारत आणि रशियाच्या या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमा एकमेकांपासून कशा वेगळ्या आहेत हे समजून घेऊया.

काय आहे दोन्हींमधला फरक?

भारताचे चांद्रयान-३ हे गुरुत्वाकर्षण शक्तींवर अधिक अवलंबून आहे. प्रक्षेपणानंतर ते पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवण्यात आले. जोपर्यंत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 ची कक्षा काही युक्त्यांद्वारे वाढवली नाही, तोपर्यंत ते त्याच मार्गावर फिरत राहिले. हळूहळू चांद्रयान-3 पृथ्वीपासून दूर ढकलले गेले आणि नंतर ते चंद्राच्या कक्षेकडे नेले गेले.

चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर त्याच प्रकारे आता चांद्रयान-3 हळूहळू चंद्राच्या दिशेने ढकलले जात आहे. चांद्रयान 1 (2008) आणि चांद्रयान-2 (2019) या पूर्वीच्या चंद्र मोहिमांमध्ये भारताने हीच पद्धत अवलंबली होती. तसेच रशियन रॉकेट चांद्रयानापेक्षा मोठं आणि अधिक शक्तिशाली आहे. त्या मानाने भारताचं रॉकेट लहान आणि कमी खर्चिक आहे.

रशियन रॉकेट अधिक शक्तीशाली...

Luna-25 मध्ये उच्च-शक्तीचे रॉकेट आहे जे जास्त इंधन वाहून नेऊ शकते. रशियाने त्यात सोयुझ २.१ रॉकेट ठेवले आहे. ते 46.3 मीटर उंच आहे. 10.3 मीटर व्यासाच्या या रॉकेटचे वजन 313 टन आहे. या चार टप्प्यातील रॉकेटने 'लुना-25' लँडर पृथ्वीच्या बाहेर गोलाकार कक्षेत सोडले. हे चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी पुरेसे सामर्थ्य देते.

सोयुझ रॉकेटमुळे लुना-25 ला पृथ्वीच्या कक्षेत थांबावे लागले नाही. त्यामुळेच भारताचे चांद्रयान-3 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर मऊ लँड करेल अशी अपेक्षा आहे. तर रशियाचे Luna-25 हे विमान त्याच्या दोन दिवस आधी 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT