Mission chandrayaan 3 Latest update  Saam TV
देश विदेश

Chandrayaan 3 Update : तो सध्या काय करतो.. चंद्रावरच्या विक्रम लँडरचे 'प्रज्ञान' रोव्हरनं काढले Photo, २ गोष्टी स्पष्ट दिसल्या!

Moon misson : रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजनचे पुरावे मिळाले आहेत. तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे.

प्रविण वाकचौरे

Chandrayaan 3 :

इस्रोचं चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर लँड झाल्यानंतर त्याने चंद्रावरुन आपलं काम सुरु केलं आहे. २३ ऑगस्टपासून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन विविध गोष्टींच संशोधन करत आहे. कालच रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजनचे पुरावे मिळाले आहेत. तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे.

विक्रम लँडर चंद्रावर नेमकं कसं दिसतंय, याचा फोटो प्रज्ञान रोव्हरने काढला आहे. इस्रोने याबाबत ट्वीट केलं आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं की, ''स्माईल प्लीज. प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा सकाळी फोटो काढला. प्रज्ञान रोव्हरच्या नेव्हिगेशन कॅमेऱ्याने हा फोटो काढला आहे.'' (Latest Marathi News)

याआधी प्रज्ञान रोव्हरवर बसवलेल्या उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरची उपलब्धता असल्याची माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना इस्रोने सांगितलं की, अपेक्षेप्रमाणे अॅल्युमिनिअ, कॅल्शिअम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅगनीज, सिलिकॉन शोधले आहे.

हायड्रोजनच्या अस्तित्वाबाबतही सखोल संशोधन सुरु आहे. हायड्रोजनचा शोध लागल्यान चंद्रावर पाण्याच्या उपलब्धतेची माहिती मिळू शकते. जर याबाबत शोध लागल्यास ही चांद्रयान ३ चं हे सर्वात मोठं यश मानलं जाईल. अवघ्या जगाला यातून फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT