ISRO Scientist Sohan Yadav SAAM TV
देश विदेश

Chandrayaan 3 Mission: चांद्रयान-3 मोहिमेत ट्रक ड्रायव्हरच्या मुलाची महत्त्वाची भूमिका, छोट्या गावातून घेतली गगनभरारी

Chandrayaan 3 Scientist Sohan Yaday: इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या संपूर्ण टीमने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. या टीममध्ये रांची येथील शास्त्रज्ञ सोहन यादव यांचाही समावेश आहे.

Chandrakant Jagtap

Chandrayaan 3 Launch, Scientist Sohan Yaday: चांद्रयान-3 ने आज दुपारी 2.35 वाजता चंद्राच्या दिशेने उड्डाण (Launch Of Chandrayaan-3) केले. हे चांद्रयान-3 पुढील महिन्यात 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे. इस्रोच्या (Indian Space Research Organisation) शास्त्रज्ञांच्या संपूर्ण टीमने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. या टीममध्ये रांची येथील शास्त्रज्ञ सोहन यादव यांचाही समावेश आहे.

सोहन यांदव यांचे वडील ट्रक चालक आहेत, तर आई गृहिणी आहे. रांची येथील सरस्वती शिशु मंदिर येथूनच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. रांचीच्या तोरपा भागातील तापकारा गावातील ते रहिवासी आहेत. इस्रोमध्ये काम करणाऱ्या सोहन यांचा ऑर्बिटर इंटिग्रेशन आणि टेस्टिंग टीममध्ये समावेश आहे. मिशन गगनयानच्या चमूमध्ये देखील त्यांचा समावेश होता.

सोहन यांनी १५ दिवसांपूर्वी त्याची आई देवकी देवी आणि भाऊ गगन यादव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला तेव्हा ते या चांद्रयान-३ मोहिमेविषयी खूप उत्सुक होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

मुलाच्या यशासाठी आईची वैष्णोदेवीकडे प्रार्थना

आता आपण चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतरच १५ दिवसांनी बोलू शकू, असे सोहन यांनी आपल्या आईला फोनवर सांगितले होते. आई देवकी देवी आणि भाऊ गगन यादव यांनी माता वैष्णोदेवीच्या मंदिरात जाऊन चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी आणि सोहन यांच्या यशासाठी शुभेच्छा प्रार्थना केली. (Breaking News)

सोनह यांचे वडील आहेत ट्रक ड्रायव्हर

सोहन यांचे वडील घुरा यादव हे ट्रक चालक आहेत. तापकारासारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन सोहन शास्त्रज्ञ झाले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण तापकरा येथील शिशु मंदिरात झाले. गेल्या सात वर्षांपासून ते इस्रोशी जोडले गेले आहेत. (Tajya Marathi Batmya)

चांद्रयान-3 चा उद्देश काय?

चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी शुक्रवारी (14 जुलै) 2:35 वाजता पृथ्वीवरून उड्डाण केले. यानंतर सुमारे 45 ते 50 दिवस प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. चंद्रावर अचूक लँडिंग साध्य करण्यासाठी भारताची तांत्रिक क्षमता प्रदर्शित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

SCROLL FOR NEXT