Pragyan Rover on Moon News Update Saam Tv
देश विदेश

Pragyan Rover on Moon: चंद्रावर नेमकं काय करत आहे 'प्रज्ञान रोव्हर', इस्रोने दिली महत्वाची माहिती; वाचा...

Chandrayaan-3 News Update: चंद्रावर नेमकं काय करत आहे 'प्रज्ञान रोव्हर', इस्रोने

Satish Kengar

Pragyan Rover on Moon: अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ ने २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. चंद्रावर पाणी किंवा बर्फ आहे की नाही, तिथे कोणते खनिजे आहेत? भविष्यात माणूस चंद्रावर वास्तव्य करू शकतो का, त्यासाठी तिथे पोषण असं वातावरण आहे की नाही, किंवा ते निर्माण करता येईल का? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इस्रोने ही मोहीम राभवली आहे.

या मोहिमेअंतर्गत १४ दिवस प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरणार आहे. यातुन शास्त्रज्ञांना चंद्रावरील विविध गोष्टींचा शोध लावण्यास मदत होईल. तसेच अनेक रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होण्याची देखील शक्यता आहे. मात्र प्रज्ञान रोव्हर चंद्रावर नेमकं काय करत आहे, याबद्दल आता स्वतः इस्रोने माहिती दिली आहे.

इस्रोने ट्वीट करत दिली माहिती

इस्रोने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये इस्त्रोने प्रज्ञान रोव्हरचा एक नवीन व्हिडीओही जोडला आहे आणि म्हटलं आहे की, ''प्रज्ञान रोव्हर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी शिवशक्ती पॉइंटभोवती फिरत आहे.''  (Latest Marathi News)

मिशन चांद्रयान-३ मुळे भारताला काय होणार फायदा?

दरम्यान, चांद्रयान-३ मोहिमेमुळे भारताला काय फायदा होणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर चांद्रयान-३ सोबत पाठवण्यात आलेले प्रज्ञान रोवर चंद्रावरील पणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अद्यापही सूर्यप्रकाश पडलेला नसून अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोवरसाठी ऐतिहासिक असेल. रोवरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली सर्व माहिती रोवर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या घटकांची उपस्थिती शोधण्यात येईल. चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक कामगिरीमुळे स्पेस सायन्समध्ये भारताचे मोठे योगदान असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT