नवी दिल्ली: देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्वाधिक संख्या ही सर्व्हायकल कॅन्सरची असते. सर्व्हायकल कॅन्सरग्रस्त बहुतांश महिला एडव्हान्स स्टेजला असतानाच उपचारांसाठी डॉक्टरकडे जात असतात. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. अनेकदा रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होतं.
मात्र, आता या जीवघेण्या सर्व्हायकल कॅन्सरवर प्रभावी लस उपलब्ध झाली आहे. भारतानं पहिली लस विकसित केली आहे. क्वाड्रिवेलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरल व्हॅक्सिन (QHPV) असं या लशीचं नाव आहे.
सर्व्हायकल कॅन्सरवर (Cervical Cancer) प्रभावी ठरणारी QHPV लस आझ लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ही लस लाँच करण्यात आली. या लसीमुळे सर्व्हायकल कॅन्सरला थोपवण्यात बऱ्याच अंशी मदत मिळणार आहे. (Vaccine)
ही लस सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं तयार केली आहे. सीरम इन्स्टिट्युट आणि डिपार्टमेंट अँड बायोटेक्नोलॉजी यांनी संयुक्तपणे ही लस लाँच केली आहे. एचपीव्ही व्हॅक्सिनमुळे महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकतो. ही लस तुलनेने खूपच स्वस्त आणि सहज उपलब्ध होणार आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व्हायकल कॅन्सरसाठी यापूर्वी एचव्हीव्ही लस उपलब्ध आहे. मात्र, लोकांना या लशीबाबत माहिती नाही. मात्र, पहिलीच क्वाड्रिवेलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस व्हॅक्सिन सध्याच्या लसीपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल.
लसीच्या किंमतीबाबत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले की, आम्ही पुढील काही महिन्यात या लसीच्या किंमतीची घोषणा करू. ही किंमत २०० ते ४०० रुपये इतकी असेल. आम्ही निर्मिती विभाग आणि सरकारशी चर्चा केल्यानंतर यावर अंतिम चर्चा करू. ही लस पुढील काही महिन्यांत उपलब्ध होईल. सुरुवातीला ही लस आम्ही संपूर्ण देशभरात उपलब्ध करून देऊ. त्यानंतरच ती जगभरात दिली जाईल. २ वर्षांत २०० दशलक्ष डोस निर्मितीची तयारी केली आहे.
विशेषज्ज्ञांनी सांगितले की, ही लस राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण धोरणात लागू करण्यात येईल. सध्या जगभरात सर्व्हायकल कॅन्सरवर दोन लस उपलब्ध आहेत. यात पहिली म्हणजे क्वाड्रिवेलेंट व्हॅक्सिन तर दुसरी बायवेलेंट व्हॅक्सिन. जी सीरमने तयार केली आहे. ती हेपेटायटीस बी व्हॅक्सिनप्रमाणेच व्हीएलपीवर आधारित आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या लसीमुळे सर्व्हायकल कॅन्सरला थोपवू शकतो. या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, अशी आशा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.