Central Jail Saam TV
देश विदेश

Central Jail Restaurant Viral Video : बाबो! तुरुंगात मिळतंय घरच्या सारखं जेवण; पत्ता जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO

Viral Video : अतरंगी! जेलची हवा खायचीये का? मग या ठिकाणी नक्की भेट द्या, सन्मानात पोटभर मिळेल जेवण

Ruchika Jadhav

Bangalore Jail Restaurant : खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आता विविध प्रकारचे रेस्टॉरंट, हॉटेल्स सुरू झाले आहेत. या हॉटेलची स्पर्धा इतकी वाढली आहे की, प्रत्येक जण आपल्या खवय्यांना काहीतरी अनोख्या पद्धतीने जेवणाचा आस्वाद देण्याचा प्रयत्न करतात. अशात आजवर तुम्ही विविध प्रकारच्या थाळ्या चाखल्या असतील. (Viral Video)

सुरुवातीला पदार्थाच्या नावावरून थळीचे नाव ठेवले जायचे. यामध्ये वेज थाळी, चिकन, मटण थाळी, फिश थाळी अशा थाळ्या होत्या. यामध्ये थोडा ट्रेण्ड बदलून आता विविध नावीन्यपूर्ण थाळ्या आल्यात. यामध्ये आमदार थाळी, गावरान थाळी यासह सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेली गौतमी थाळी देखील बाजारात आली आहे.

प्रत्येक ठिकाणी आता अशा प्रकारच्या थीम नुसार अनेक थाळ्या पाहायला मिळतात. अशात सध्या सोशल मीडियावर जेलची थीम आलेली थाळी जोरदार व्हायरल झाली आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं. त्यात काही व्यक्तींना जेल नेमकं कसं असतं. इथे एकदा भेट देता येईल का? असेही प्रश्न काहींना पडतात. आता तुम्हाला देखील जेलची हवा खायची असेल तर त्याची सोय झाली आहे. या जेलमध्ये फक्त हवा नाही तर पोटभर जेवण देखील मिळत आहे.

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर तुरुंगातील जेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. खरं तर हे एक हॉटेल आहे. इथे सर्व प्रकारचे पदार्थ चाखायला मिळतात. या हॉटेलची थीम जेल आहे. जेल प्रमाणे येथे जेवण मिळते. त्यामुळे अनेक हौशी व्यक्ती या जेलमध्ये येऊन जेवणाचा आस्वाद घेतात.

सध्या या जेल रेस्टॉरंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही व्यक्ती जेवणासाठी या जेलमध्ये आलेत. इथे सुरुवातीलाच सेंट्रल जेलचे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर पाहून हे मोठे जेल असल्याचे भासते. इथे सर्व वेटर देखील कैद्याच्या कपड्यांमध्ये जेवण वाढत्या. तसेच जेवणसाठी तुरुंगात अशी जर्मलची भांडी असतात तशीच भांडी येथे ठेवण्यात आली आहेत.

हॉटेल नेमकं आहे कुठे?

हे हॉटेल बेंगळुरू येथे आहे. इथे भेट देण्यासाठी आणि तुरुंगातील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हालाही बंगळुरू (Bangalore) येथे जावे लागेल. एका फूड ब्लॉगरने हे हॉटेल सुरू केले आहे. सध्या जेलमधील जेवणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्हुव्ज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT