modi government news  saam tv
देश विदेश

Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका; केंद्र सरकारने महागाई भत्त्याबाबत उचललं मोठं पाऊल

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कोरोना काळात रखडलेल्या महागाई भत्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. कोरोना काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा रोखण्यात आलेला १८ महिन्यांचा महागाई भत्ता देणार नसल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. (Latest Marathi News)

केंद्र सरकारच्या (Central Government) निर्णयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लिखित परिपत्रकात स्पष्ट केले की, 'केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महगाई भत्ता (DA) आणि डियरनेस रिलीफ हा तीन हप्त्यांमध्ये थकबाती देण्याची कोणतीही योजना नाही'. चौधरी पुढे म्हणाले की, ' केंद्र सरकारच्या विभिन्न कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी रखडलेल्या १८ महिन्याच्या महगाई भत्ता आणि डीआर मिळण्यासाठी अर्ज केले होते'.

केंद्र सरकारने कोरोना काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Employees) मिळणाऱ्या महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना मिळणारी 'डीआर' रोखली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी सांगितले की, '१ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ रोजी कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला होता. या निर्णयामुळे सरकारने ३४,४०२.३२ कोटी रुपयांची बचत केली होती.

पंकज चौधरी यांच्या माहितीनुसार, महामारीच्या काळात लोकांना सहाय्य करणाऱ्या योजनेसाठी अनेक रुपयांची तरतूद केली होती. त्याचा परिणाम हा २०२०-२०२१ आणि त्याच्या पुढील काळात देखील दिसून आला. सरकारने स्पष्ट केले की, 'सध्या अर्थसंकल्पीय तूट एफआरबीएम कायद्यातील तरतुदींच्या तुलनेत दुप्पट आहे, त्यामुळे डीए देण्याचा प्रस्ताव नाही. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT