Pension Scheme Saam Digital
देश विदेश

Video : अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार; केंद्र सरकार नवी पेन्शन योजना आणणार, कशी असेल नवी योजना?

New Pension Scheme for central government employee : सातत्याने जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या सरकारी नोकरदारांना केंद्र सरकार दिलासा देण्याच्या तयारीत आहे. मात्र ही नवी पेन्शन योजना कशी असणार आहे? या पेन्शनचा किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार? जुनी आणि नवी पेन्शन यामध्ये नेमका फरक काय? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

साम टिव्ही

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

नवी दिल्ली : सातत्याने जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या सरकारी नोकरदारांना केंद्र सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शन देण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्यात. अर्थसंकल्पात याविषयी घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र या पेन्शन योजनेत नेमकं काय असणार आहे? पाहूयात.

कशी असेल नवी पेन्शन योजना?

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन मिळणार

60 हजार निवृत्तीवेतन असल्यास 30 हजार पेन्शन

2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा मार्ग खुला होणार

87 लाखांपेक्षा अधिक कर्मचा-यांना फायदा होणार

2004 नंतर लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली होती. या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगारातून 10 टक्के रक्कम कापली जात होती. त्यात सरकार 14 टक्के रक्कम जमा करत होते. यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन दिलं जात होतं. मात्र यावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत पेन्शनचा मुद्दा तापवला होता. तर याच मुद्द्याचा फटका कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूकीत सरकारला बसला होता.

जुनी पेन्शन योजना

जुन्या पेन्शन योजनेत 50% पेन्शनची हमी

जुनी पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पती/पत्नीलाही पेन्शन

महागाई वाढली तर महागाई भत्त्याची तरतूद

ही योजना सरकारी तिजोरीवर आधारीत

सध्याची नवी पेन्शन योजना कशी आहे?

नवीन पेन्शन योजनेत पेन्शनची पक्की हमी नाही

कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10 आणि सरकारच्या 14% NPSमध्ये गुंतवणूक

जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत तफावत

महागाईनुसार भत्त्यात वाढ होण्याची तरतूद नाही

ही योजना बाजारावर आधारित आहे.

याच जुन्या पेन्शनवरून देशभरात संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्याचा निवडणूकीत फटका बसल्यानंतर सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी वित्त आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीनं दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन अर्थसंकल्पात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू झाली तर हा नोकरदारांसाठी मोठा दिलासा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Vastu Tips: जेवणासाठी ताटात ३ पोळ्या वाढताय तर थांबा; अन्नासंबंधीचे वास्तू नियम जाणून घ्या

Thane : ठाणे हादरलं! महिला डॉक्टरने इमारतीतून उडी मारून संपवलं जीवन; ३ मुलं झाली पोरकी

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

Red Vs White Onion: लाल की पांढरा? कोणता कांदा आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT