मुंबई : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारती एअरटेल फाऊंडेशनने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. यंदाच्या वर्षी 250 विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून संस्थेचा 4,000 स्कॉलर्सपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा आहे. या योजनेसाठी दरवर्षी 100 कोटींहून अधिक खर्च करण्याचा संस्थेचा मानस आहे.
या शिष्यवृत्तीची संकल्पना गुणवंत विद्यार्थी, वंचित विद्यार्थी, शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर करणे. ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 8.5 लाखांपेक्षा अधिक नाही, त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीला 'भारती स्कॉलर्स' म्हणून ओळखले जाणार आहेत. कोर्स चालू असतानाच्या पूर्ण कालावधीत त्यांना कॉलेजच्या फीच्या 100% रक्कम मिळणार आहे. तसेच लॅपटॉप सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह (हॉस्टेल) व खाणावळ (मेसचे) फी देण्यात येणार आहे.
या शिष्यवृत्तीच्या माध्यामातून स्कॉलर्स पदवीधर झाले आणि नंतर त्यांना फायदेशीर नोकरी मिळाली, की मग त्यांना कमीत कमी 1 विद्यार्थ्याला सतत, स्वेच्छेने मदत करण्यास प्रोत्साहित करणे असा संकल्प त्यांच्यासमोर असणार आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून टॉप 50 एन.आय.आर.एफ (इंजिनीअरिंग) कॉलेजांमध्ये पदवीपूर्व (यूजी) इंटिग्रेटेड टेक कोर्सेस यांच्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
भारती एअरटेल फाऊंडेशनचे राकेश भारती मित्तल काय म्हणाले?
भारती एअरटेल फाऊंडेशनचे राकेश भारती मित्तल म्हणाले की, "गेल्या 25 वर्षांचा विचार करत आमच्या शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून 6 मिलियन+ व्यक्तींपर्यंत पोहोचू शकल्याचा अभिमान आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमासोबत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची आमची बांधिलकी आम्ही वाढवत आहोत. यामुळे शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करता येईल आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता येईल'.
'शिक्षण हा सामाजिक प्रगती आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याचा पाया आहे. अनुकरणीय शिक्षणाचा संगम आणि विविध स्तरातील विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण, हे नेहमीच निवडलेल्या संस्थांनी प्रदर्शित केलेले आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रात या तत्त्वांना बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.