8th Pay Commission latest update  Saam tv
देश विदेश

Video : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! अर्थसंकल्पात 8 व्या वेतन आयोगाची घोषणा? पगार किती वाढणार?

8th Pay Commission latest update : सातत्याने 8 व्या वेतन आयोगाची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हा 8 वा वेतन आयोग लागू झाला तर तुमच्या पगारात किती वाढ होणार? यावरचा हा खास रिपोर्ट....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : सरकारी कर्मचा-यांना आता वेध लागले आहेत ते 8 व्या वेतन आयोगाचे. त्यामुऴे केंद्र सरकारनंही त्यादृष्टीनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱी आणि पेन्शनधारकांचे विद्यमान वेतन, भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आलाय. तर यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे या आठव्या वेतन आयोगामुळे लेव्हलनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन किती असणार ते पाहूयात....

लवकरच 8 वा वेतन आयोग?

लेव्हल 7 वा वेतन 8 वा वेतन

1 18,000 21,600 रू.

2 19,900 23,880 रू.

3 21,700 26,040 रू.

4. 25,500 30,600 रू.

5. 29,200 35,040 रू.

15. 1,82,200 2,18,400 रू.

16. 2,05,400 2,46,480 रू.

17. 2,25,000 2,70,000 रू

18. 2,50,000 3,00,000 रू.

हा आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने उदारीकरणाच्या निर्णयानंतर 1996 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची सुरुवात केली. तर आतापर्यंत सात आयोग लागू करण्यात आलेत. आतापर्यंत कोणत्या वेतन आयोगात किती वाढ देण्यात आली आहे ते पाहूयात...

कोणत्या वेतन आयोगात किती वाढ?

4 था वेतन आयोग- किमान वेतनात 27%वाढ

5 वा वेतन आयोग- किमान वेतनात 31 टक्के वाढ

6 वा वेतन आयोग- किमान वेतन 7000 करण्यात आले

7 वा वेतन आयोग- किमान वेतनात अडीच पट वाढ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन 23 जुलैला 2024-25 साठीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. त्यामुळे या घोषणेकडे कर्मचाऱ्यांसह देशाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT