Omicron Wave Saam Tv
देश विदेश

Corona: भारताला कोरोना लाटेबाबत सावधानतेचा इशारा! केंद्राचे राज्यांना पत्र...

चीन आणि आग्नेय आशिया तसेच युरोपातील काही देशांमध्ये कोविड-19च्या नवीन लाटेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही (Government Of India) सतर्क झाले आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीन आणि आग्नेय आशिया तसेच युरोपातील काही देशांमध्ये कोविड-19च्या नवीन लाटेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही (Government Of India) सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून यासंदर्भात इशारा दिला आहे.

राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, आता कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या जास्त नाही, असा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासन आणि प्रशासनाने गाफील राहू नये. तसेच राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात सर्वांना सतर्क राहताना पाच गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले आहे. यामध्ये कोरोना चाचणी, उपचार, लसीकरण आणि कोविड-अनुकूल नियम यांचा समावेश आहे.

पत्राद्वारे राज्यांना इशारा;
पत्राद्वारे, केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना INSACOG नेटवर्कला (INSACOG Network) पुरेशा प्रमाणात नमुने (Samples) पाठवत राहण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून नवीन कोरोना प्रकार वेळेत शोधता येईल. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'दक्षिण-पूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट दिसत आहे. या कारणामुळे, आरोग्यमंत्र्यांनी 16 मार्च रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. याबैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जीनोम सिक्वेन्सिंगवर (Genome Sequencing) भर द्यावा. तसेच कोविड-19च्या फैलाववर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी सूचना करण्यात आल्या.

लोकांना सतर्क राहण्याचे आदेश;
केंद्र सरकारने म्हटले आहे की, राज्यांनी लोकांना अँटी-कोविड लस (Anti Covid Vaccine) घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच, लोकांनी मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवा आणि आपल्या स्वच्छतेकडे लक्ष द्या, असेही सांगितले आहे.

हे देखील पहा-

चीनमधील कोरोना पुन्हा वाढतोय;
चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉनची (Omicron Variant) लाट सतत वाढत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले आहे. अश्या परिस्थितीत पुढील दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या दोन आठवड्यांत कोरोनाच्या नव्या लाटेवर नियंत्रण मिळवले गेले नाही, तर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळू शकतो, असा इशारा सध्या तज्ज्ञ देत आहेत. चीन आपला शेजारी असल्याने भारतानेही काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT