India vs china Clash Update News  Saam TV
देश विदेश

India Vs China : भारत-चीन संघर्ष सुरू असतानाच केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नव्या गाइडलाइन्स जारी

भारताचे जवान आणि चीन सैनिकांमध्ये संघर्ष उफाळून आलेला असतानाच केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

Nandkumar Joshi

India vs China Conflict Updates : एका बाजूला अरुणाचल प्रदेशात चीन सैन्य आणि भारतीय जवानांमध्ये तणाव वाढलेला असतानाच, दुसरीकडे केंद्रातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. चिनी सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

केंद्राने सरकारची विविध मंत्रालये आणि पीएसयूमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एका SOP चं अर्थात स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात बेसिक आयटी हायजीनसारखे संगणक बंद करणे, ईमेलमधून साइन ऑउट करणे, पासवर्ड अपडेट करणे यांसारख्या सूचना आहेत. या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केले तर संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

एम्स सायबर हल्ल्यामागे असू शकते हे कारण

टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एम्स सायबर हल्ल्यामागे एका कर्मचाऱ्याने इन बेसिक हायजीनचं पालन केलं नव्हतं, असे एक कारण समोर आले आहे. सूत्रांनी सांगितले की, कर्मचारी आपण वापरत असलेले कॉम्प्युटर लॉग ऑफ करणे किंवा आपले इमेल साइन आऊट करण्यास विसरतात किंवा ते करत नाहीत. असं एम्समध्येही झालेले असू शकतं अशी शंका उपस्थित केली जात आहे. आम्ही यंत्रणा पुन्हा सुरू करू शकत होतो, असेही सूत्रांनी सांगितले. (Latest Marathi News)

चिनी हॅकरचं कृत्य

भारतीय अधिकारी पॉवर ग्रिड आणि बँकिंग यंत्रणांवरील सायबर हल्ले रोखण्यात सक्षम होते. तर हॅकर्स एम्स यंत्रणेच्या सायबर सुरक्षेत छेडछाड करण्यास सक्षम होते. अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यात बहुतांश चिनी हॅकरचा हात असतो, जे भारतीय यूजरचे कॉम्प्युटर वापरून स्लीपर सेलच्या स्वरूपात काम करतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (India China)

SOP ची प्रभावी अंमलबजावणी

अशा प्रकारचे सायबर हल्ले वारंवार होत असल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत सरकारनं काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंच अशा घटना घडतात. त्यामुळं सरकारनं आता या गाइडलाइन्सचे पालन करण्याची सक्ती केली आहे. दोषी सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT