नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा मुद्दा आज संसदेत गाजला. विरोधकांनी चर्चेची मागणी करत संसदेत गदारोळ केला. दरम्यान, या मुद्द्यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत उत्तर दिलं आहे. (Rajnath Singh on Tawang Clash)
चीनने 9 डिसेंबर रोजी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला आपल्या देशात परत जावे लागले. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या चकमकीत एकही भारतीय जवान शहीद झाला नसून कोणीही जवान गंभीर जखमी झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आपलं लष्कर कटिबद्ध आणि सज्ज आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे असे देखील राजनाथ सिंग म्हणाले.
मला खात्री आहे की हे सभागृह आपल्या सैन्याच्या शौर्याला आणि धैर्याला एकमताने पाठिंबा देईल. चीनच्या बाजूने अशा कारवाईपासून मनाई करण्यात आली असून सीमेवर शांतता राखण्यास सांगितले आहे. हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनैतिक पातळीवरही मांडण्यात आला आहे.
तवांग येथे भारताची चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत लेखी निवेदन वाचून दाखवले. ते म्हणाले, 9 डिसेंबर रोजी पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात घुसखोरी केली. भारतीय जवानांनी या प्रयत्नाला खंबीरपणे तोंड दिले. भारतीय जवानांनी धैर्याने या परिस्थितीचा सामना केला आणि चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.