Narendra Modi
Narendra Modi Saam Tv
देश विदेश

BBC Documentry: मोठी बातमी! BBC ची Documentry सरकारकडून ब्लॉक, PM मोदींवर केले होते आरोप

Gangappa Pujari

BBC Documentry: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने(BBC ) तयार केलेल्या डॉक्यूमेंट्रीवरुन वाद निर्माण झाला असताना केंद्राने आता मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ट्विटर आणि युट्यूबलाडॉक्यूमेंट्री संबंधित सर्व लिंक काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.

याआधी केंद्राने ही डॉक्यूमेंट्री मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा भाग असल्याचे म्हटले होते. या डॉक्यूमेंट्रीमध्ये 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतात 2002 मध्ये गुजरात मध्ये झालेल्या दंगली संदर्भात बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरी संदर्भातील एक क्लिप व्हायरल होत आहे. ती ब्लॉक करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. ही डॉक्युमेंटरी एक दुष प्रचाराचा भाग आहे या डॉक्युमेंटरी निष्पक्षतेची कमी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरदींब बाग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

सदर डॉक्युमेंटरी भारतात प्रदर्शित करण्यात आलेली नसल्याचं देखील परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने यूट्यूब-ट्विटर वरील व्हिडीओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच IT Rules 2021 च्या नुसार हे आदेश दिल्याचेही स्पष्ट केले आहे. (Government Of India)

या डॉक्युमेंटरी मागे एक अजेंडा असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. बीबीसी ने दोन भागात प्रसारित केलेली डॉक्युमेंटरी 2002 मधील गुजरात दंगली संदर्भात प्रश्न उपस्थित करते. या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT