cbse compartment exam 2022 class 10 12 timetable released.  saam tv
देश विदेश

CBSE Compartment Exam 2022 : सीबीएसई दहावी, बारावी कंपार्टमेंट परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांना मिळणार 15 मिनिटं अतिरिक्त वेळ

ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर काेराेना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून घेतली जाईल.

साम न्यूज नेटवर्क

Cbse Compartment Exam 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने कंपार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक (CBSE चं) अधिकृत संकेतस्थळ (cbse.gov.in) येथे पाहण्यास उपलब्ध केले आहे.

इयत्ता दहावीची कंपार्टमेंट परीक्षा 23 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत हाेईल. तसेच इयत्ता बारावीची कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टला होणार आहे. इयत्ता 10वी, 12वीच्या परीक्षेचा कालावधी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 पर्यंत 2 तासांचा आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा वेगळा वेळ दिला जाणार आहे.

ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर काेराेना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून घेतली जाईल. मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर राखणे यासह अन्य सूचनांचे पालन करणे विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील.

यंदा सीबीएसईचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल 22 जुलैला जाहीर झाला. बारावीच्या निकालात एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.71 टक्के होती आणि इयत्ता दहावीमध्ये ती 94.40 टक्के होती.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तपासण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT