सीबीएसई बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट
निकालाची संभाव्य तारीख आली समोर
बारावीचा निकाल पुढील काही आठवड्यात लागण्याची शक्यता
CBSE Class 12 Result 2026: सीबीएसई बारावीच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. बोर्डाने अद्याप निकालाबाबत कोणतीही अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही. परंतु विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट क्रमांक आणि अॅडमिट कार्ड स्वत:जवळच ठेवलं पाहिजे. पुढील काही आठवड्यात बारावीच्या निकालाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षाच्या निकालाच्या अंदाजानुसार, सीबीएसई मे महिन्याच्या मध्य आणि शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. परंतु यंदा बोर्डाकडून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत निकालाची माहिती मिळवण्यासाठी 'cbse.gov.in' या वेबसाइटवर लक्ष द्यायला हवे.
सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहण्यास तांत्रिक अडचणी आल्यास, विद्यार्थ्यांना पर्यायी पोर्टल्सवर निकाल पाहता येईल. cbseresults.nic.in , results.cbse.nic.in, cbse.gov.in , digilocker.gov.in या वेबसाइटवर निकाल पाहू शकता.
तुम्ही निकालाची डिजिटल प्रत आणि मायग्रेशन सर्टिफिकेट 'Digilocker' वर मिळवू शकता. तुम्ही तुमच्या आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारावर निकालाची डिजिटल प्रत मिळवू शकता. तुम्ही उमंग मोबाइल अॅपवरही निकाल पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट नंबर आणि शाळांच्या कोडची गरज लागेल.
सीबीएसईच्या नियमानुसार, विद्यार्थी पास होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीत कमी ३३ टक्के गुण मिळवावे लागतील. जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात नापास होतील, त्यांना कंपार्टमेंट परीक्षेसाठी संधी दिली जाईल.
सीबीएसईचा दहीवाचा निकाल जाहीर
तत्पूर्वी, सीबीएसईने १५ एप्रिल २०२६ रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांनी results.cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि cbse.gov.in या वेबसाइटवर निकाल पाहिला. सीबीएसईने दहावीची परीक्षा द्वी-बोर्ड सिस्टमनुसार आयोजित केली होती. बोर्डाची पहिली परीक्षा १७ फेब्रुवारी ते २२ मार्च २०२६ दरम्यान झाली. दुसऱ्यांदा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना परीक्षा ही १५ मे ते १ जून २०२६ रोजीपर्यंत आयोजित केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.