पश्चिम बंगालमधील टीएमसी पक्षाच्या नेत्या माजी खासदार महुआ मोईत्रा (TMC Former MP Mahua Moitra) यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला. त्यांच्या कोलकात्यातील घरी सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहेत. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप महुआ मोइत्रा यांच्यावर केला जात आहे. याप्रकरणी सकाळपासून अनेक ठिकाणांवर छापेमारी सुरू (CBI Raid On Mahua Moitra) आहे. (latest marathi news)
टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज सीबीआयने महुआ यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती (West Bengal Politics) मिळतेय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. ईडीने त्यांना याअगोदर 19 फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं (Politics News) होतं. महुआ यांना संसदेच्या एथिक्स कमिटीनं दोषी ठरवलं होतं. महुआ यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटलं ((CBI Raids) होतं.
मागील वर्षी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रांवर आरोप केला होता. महुआ यांनी महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न (CBI Raids TMC Former MP) विचारले,असा आरोप दुबे यांनी केला होता.
तसंच महुआ यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप देखील करण्यात आलेला होता.त्यानंतर हे प्रकरण एथिक्स कमिटीकडे पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी महुआ (Mahua Moitra) दोषी असल्याचं निष्पन्न झालं होतं. याप्रकरणी कारवाई करत त्यानंतर महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.