CBI Raid on Satyapal Malik House  Saam TV
देश विदेश

Breaking News : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी

CBI Raid on Satyapal Malik House : किरू हायड्रो प्रकल्पाच्या घोटाळ्यातील आरोपावरु ही छापेमारी सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

प्रविण वाकचौरे

New Delhi :

मोदी सरकारवर गंभीर आरोप करणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने दिल्लीत 30 ठिकाणी छापे टाकले आहेत.

किरू हायड्रो प्रकल्पाच्या घोटाळ्यातील आरोपावरुन ही छापेमारी सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीबीआयच्या धाडीनंतर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, मागील ३-४ दिवसांपासून मी आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असा परिस्थितीत सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात आहेत. (Latest Marathi News)

माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

किरु हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाचे 2019 मध्ये सुमारे 2,200 कोटींना एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा संशय सीबीआयला आहे. या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT