Arvind Kejriwal Arrest Aap Leader Claim Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: सोमवारी आधी नोटीस येईल, नंतर केजरीवाल यांना अटक होणार; आप नेत्याचा मोठा दावा

Kejriwal Arrest Aap Leader Claim: आप नेत्या आतिशी यांनी दावा केला आहे की, काँग्रेस आणि आपमधील जागावाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाल्यापासून केजरीवाल यांना धमक्या मिळू लागल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Arvind Kejriwal Arrest Aap Leader Claim:

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पाच राज्यांमध्ये एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. आज जागावाटपाची घोषणाही करण्यात आली आहे. दिल्लीत 4:3 फॉर्म्युलावर चर्चा झाली, तर गुजरातमध्ये 26 पैकी केवळ 2 जागा आम आदमी पक्षाला देण्यात आल्या आहेत. मात्र, यात त्या जागेचाही समावेश आहे, ज्यावर केजरीवाल बराच काळ ठाम होते. म्हणजे गुजरातची भरुच ही जागा आम आदमी पक्षाकडे गेली आहे. याशिवाय भावनगरमध्येही पक्ष आपला उमेदवार उभा करणार आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाने मोठा दावा केला आहे. दिल्ली सरकारचे मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी दावा केला आहे की, काँग्रेस आणि आपमधील जागावाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाल्यापासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमक्या मिळू लागल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या म्हणाल्या, आम्हाला आघाडीतून बाहेर पडण्यास ते सांगता आहेत. तसेच आम्ही आघाडीतून बाहेर पडलो नाही तर केजरीवाल यांना अटक होण्याचा धोका आहे, अशी धमकी दिली. (Kejriwal to be arrested in few days)  (Latest Marathi News)

त्या म्हणाल्या, ''जेव्हापासून इंडिया आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे, तेव्हापासून अरविंद केजरीवाल यांना सर्व बाजूंनी धमक्या मिळू लागल्या आहेत. आम्हाला सांगण्यात आले की, आम्ही बाहेर न पडल्यास ईडीनंतर आता सीबीआयही अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी त्यांच्यावर आरोप निश्चित करेल. सीबीआय सोमवारी नोटीस बजावेल आणि अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांत अटक केली जाईल, अशी माहिती आमच्याकडे आहे, असेही त्या म्हणाल्या

काँग्रेस सोबत झालेल्या आघाडीबाबत बोलताना आतिशी म्हणाल्या, ''काँग्रेस पक्षासोबत जागावाटपाच्या चर्चेला थोडा वेळ लागला असला तरी, आपने सुरुवातीपासूनच हे स्पष्ट केले होते की, इंडिया आघाडीचा हा महत्त्वाचा भाग आहे. शेवटी आज इंडिया आघाडीतील अनेक राज्यांच्या जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा आणि चंदीगडचा समावेश आहे. काँग्रेस असो की आप, आम्ही पक्षाच्या हितापेक्षा देशाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि गोव्यात इंडिया आघाडी जिंकेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यावर रॉडने वार, गळाही चिरला, भींतीवर रक्ताचे डाग; मदरशातील शिक्षकाला बायकोनेच संपवलं

Seeds: 'या' बियामध्ये आहे नॉनव्हेजपेक्षाही भरभरुन प्रोटीन, शरीरासाठी ठरेल सूपरफूड

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता पैसे हवे असतील तर...; सरकारचा नवा नियम काय?

Maharashtra Live News Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

Ramdas Kadam Vs Anil Parab: हा भा#$@...; रामदास कदमांची अनिल परब यांच्यावर आगपाखड|VIDEO

SCROLL FOR NEXT