देश विदेश

Police Arrested: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Punjab Crime News: सीबीआयने पंजाबच्या रोपार रेंजचे डीआयजी हरचरण भुल्लर यांना ५ लाखांची लाच घेताना अटक केली. त्यांच्या घरातून ५ कोटी रुपये, १.५ किलो सोने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त झाली.

Dhanshri Shintre

पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधी कारवाईदरम्यान मोठा घोटाळा उघड झाला आहे. पंजाब पोलिसांचे डीआयजी हरचरण भुल्लर यांना सीबीआयने ₹५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या अटकेनंतर सीबीआयने त्यांच्या रूपनगर येथील आवारावर छापा टाकला. याठिकाणी तब्बल ₹५ कोटींची रोकड, सुमारे दीड किलो सोने आणि मर्सिडीज तसेच ऑडीसारख्या अनेक आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या पैशांची मोजणी अजूनही सुरू असून, रोख रकमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरचरण भुल्लर हे २००९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या रूपनगर रेंजमध्ये पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर लाच घेण्याचे गंभीर आरोप असून, तक्रारदाराच्या मते त्यांनी एका खाजगी व्यक्तीमार्फत आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच प्रकरणातील एफआयआर(FIR) रद्द करण्यासाठी आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी मागितल्याचे सांगितले जात आहे. तपासात हेही समोर आले आहे की भुल्लर हे यापूर्वीपासूनच बेकायदेशीर मासिक देयके मागत होते.

सीबीआयने तक्रारीची तपासणी केल्यानंतर चंदीगडमध्ये एक सापळा रचला. सेक्टर २१ भागात डीआयजीच्या जवळच्या सहकाऱ्याला ₹८ लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याचवेळी सीबीआयने डीआयजीला एक नियंत्रित कॉल केला. ज्यात त्यांनी लाच मागितल्याचे स्वतः मान्य केले आणि तक्रारदाराला आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर सीबीआयने डीआयजीला त्यांच्या कार्यालयातून अटक केली.

कोणत्या वस्तू सापडल्या?

  • सुमारे ₹५ कोटी रोख

  • १.५ किलो सोन्याचे दागिने

  • पंजाबमधील विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे

  • मर्सिडीज आणि ऑडी सारख्या लक्झरी कारच्या चाव्या

  • २२ महागडे घड्याळे

  • लॉकरच्या चाव्या आणि ४० लिटरच्या विदेशी दारूच्या बाटल्या

  • डबल बॅरल गन, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, एअर गन आणि दारूगोळा

या छाप्यामध्ये मिळालेली मालमत्ता पाहता, हरचरण भुल्लर यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याचे सूचित होत आहे. जप्तीतून मिळालेली रोकड, सोने-चांदीचे दागिने, अनेक फ्लॅट्स, जमिनीची मालकीची कागदपत्रे आणि लक्झरी कारच्या चाव्या या गोष्टींमुळे या प्रकरणाने संपूर्ण पंजाब पोलिस व्यवस्थेत खळबळ माजवली आहे. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, संपत्तीकडे आणि बेकायदेशीर व्यवहारांकडे संबंधित इतर अधिकारी गुंतले आहेत का हे देखील पाहिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath : एका चुकीमुळे तरुणाला जीव गमवावा लागला, ते इंजेक्शन घेतलं असतं तर...

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Railway Mega Block : 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Diwali 2025 : देशभरात धनतेरसचा उत्साह! सुवर्ण, चांदी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी |VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या कामाची बातमी! लाखांचं कर्ज झटक्यात, व्याज मात्र शून्य

SCROLL FOR NEXT