Snake vs Cat Fight Video Saam Tv
देश विदेश

Snake vs Cat Fight : साप आणि मांजराची जबरदस्त फाईट; वातावरण टाईट, पाहा VIDEO

साप आणि मांजरामध्ये घमासान युद्ध व्हिडिओ व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

Snake vs Cat Fight Video : कोब्रा किंवा किरकोळ साप (Snake) नजरेस पडला तर, माणसाची सोडा प्राण्यांचीही हवा टाईट होते. मात्र, अनेकवेळा साप किंवा कोब्रा प्राण्यांची शिकार करताना चूक करतो आणि ती गोष्ट त्याच्या जीवाशी येते. सध्या सोशल मीडियावर एका साप आणि मांजराच्या घमासान युद्धाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या मांजराचं कौतुक केलंय. (Snake vs Cat Fight Viral Video)

नेमकं काय घडलं?

एक मांजर एका मोकळ्या जागेत निवांत झोपलेलं दिसत आहे. तिथे अचानक एक साप येतो आणि तो या मांजरीवर हल्ला करतो. आपल्यासमोर उभ्या असलेल्या या जीवघेण्या संकटाचा मांजरही न घाबरता सामना करतं. सापाने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला ही मांजर चोख प्रत्युत्तर देते. अखेर सापाची अवस्था अशी होते की, त्याला पळ काढावा लागतो.

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, हा साप कसा या मांजरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आहे. या सापाने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला मांजर प्रत्त्युत्तर देत आहे. या सापाला बघून मांजर एकदम सतर्क झालेली आहे. सापाचा हल्ला ती चुकवत आहे. (Cat vs Snake Real Fight Viral Video)

हा साप मांजरावर अनेक वेळा प्रहार करतो पण मांजर खूप हुशार आहे आणि ती त्याचा प्रत्येक हल्ला हाणून पाडते आणि तिच्या हुडावर अनेक चापट मारते. त्यामुळे कोब्रा घाबरून तेथून पळून जातो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी या मांजरीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

एका यूजरने सांगितले की, मांजरीने सापाला चांगलाच धडा शिकवला. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले की, मांजरीचा राग पाहून खात्रीने सापाची हवा टाईट झाली असावी, म्हणून त्याने पळ काढला. आतापर्यंत या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय.हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT