Arpita Mukherjee Saam Tv
देश विदेश

कोलकात्यात अर्पिता मुखर्जी यांच्या घरी कोट्यवधीचं घबाड; 28 कोटी रुपये, 5 किलो सोने जप्त

अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून कोट्यवधीचं घबाड जप्त करण्यात आलं आहे.

वृत्तसंस्था

कोलकाता - पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या सहकारी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्या अडचणीत वाढ होत आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी पुन्हा कोलकात्यातील (Kolkata) तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्‍या फ्लॅटमधून सुमारे 28.90 कोटी रुपये आणि 5 किलो सोने जप्त केले आहे. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे 10 तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते.

शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीने नुकतेच पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या जवळची आहे. 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या फ्लॅटमधून 21 कोटींची रोकड आणि सर्व मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या. अर्पिताला ईडीने २३ जुलै रोजी अटक केली होती.

हे देखील पाहा -

दुसरीकडे, ईडीच्या या कारवाईनंतर विरोधी पक्ष पार्थ चॅटर्जी यांना टीएमसीच्या मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करत आहेत. एवढेच नाही तर शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी ट्रेलची चौकशी करणाऱ्या ईडीने पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही चौकशी केली.

ईडीने बुधवारी सकाळी दक्षिण कोलकातामधील राजदंगा आणि बेलघरिया येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. यावेळी तिथून 28 कोटी रोख आणि 5 किलो सोने जप्त केले आहे.ही मालमत्ता कथित अर्पिता मुखर्जी यांच्या मालकीची आहे. अर्पिता मुखर्जीने ईडीच्या चौकशीदरम्यान या संपत्तीचा खुलासा केला होता.

तपास यंत्रणेला त्यांच्या चाव्या न मिळाल्याने ईडीला या फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजा तोडावा लागला. रोख मोजण्यासाठी तीन नोटा मोजण्याचे यंत्र आणावे लागले. एवढेच नाही तर फ्लॅटमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

दुसरीकडे, पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल ला. गणेशन यांची राजभवनात भेट घेतली आणि चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

चॅटर्जी सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. मग चित्रपटात साईड रोलचे काम करणारी अर्पिता व पार्थ चॅटर्जी एकमेकांना कसे ओळखतात, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तृणमूल नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीचे प्रमुख आहेत. कोलकात्यात ही सर्वात मोठी दुर्गा पूजा समिती आहे. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या २०१९ आणि २०२० मध्ये झालेल्या दुर्गापूजा समारंभाचा मुख्य चेहरा होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांना ओळखू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT