Crime News
Crime News Saam TV
देश विदेश

क्रूरतेचा कळस! मुलीशी आधी Instagramवर मैत्री, त्यानंतर अत्याचार, मारहाण आणि ब्लेडने शरीरावर...

साम टिव्ही ब्युरो

Crime News : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी इंस्टाग्रामवर मैत्री करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर मुलीच्या अंगावर ब्लेडने त्याचे नाव देखील लिहिले आहे. एकूण आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest News Update)

पीडित मुलीची इंस्टाग्रामवर कानपूरमध्ये राहणाऱ्या विकास ठाकूर नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. दरम्यान, विकासने मुलीचे फोटो काढून अश्लील व्हिडिओ बनवला. यातून तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तरुण सातत्याने तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. (Crime News)

आरोपीने मुलीला धमकी देत भेटण्यास बोलवले होते. तेथे आरोपीने तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने मुलीला गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेले. येथे त्याच्या दोन मित्रांनीही मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. यादरम्यान आणखी पाच जण तिथे आले.

दरम्यान मुलीला मारहाण देखील करण्यात आली आणि बलात्काराचा प्रयत्नही झाला. मुलीने स्वत:चा बचाव करण्यासाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले, त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. आरोपी विकासने मुलीच्या शरीरावर ब्लेडने त्याचे नाव देखील लिहिले आहे. जमलेल्या लोकांना मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली.

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विकास ठाकूरसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

Today's Marathi News Live: सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Akola News: मंदिरासाठी खोदकाम करताना जमिनीत आढळली २०० वर्षांपेक्षा जुनी इमारत; भिंतींवर होता 'राम' नामाचा उल्लेख

Akola Crime News : अकोल्यात गुरूच्या नात्याला कलंक; कुस्ती प्रशिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

SCROLL FOR NEXT