Mahua Moitra Saam Tv
देश विदेश

Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ, नव्या फौजदारी कायद्यांतर्गत FIR दाखल; काय प्रकरण आहे?

Case Against Mahua Moitra: टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. हाथरसच्या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल मोईत्रा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नव्या फौजदारी कायद्यानुसार महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलीकडेच उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये 121 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा घटनास्थळी पोहोचल्या होत्या.

यावेळी पाऊस असल्याने त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने छत्री धरून ठेवली होती. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यावर महुआ मोईत्रा यांनी X वर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. जी नंतर त्यांनी वाद वाढल्यानंतर हटवली आहे.

याची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेत महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगितलं आहे. याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने X वर पोस्ट करत लिहिलं आहे की, ''ही टिप्पणी असभ्य आणि अपमानास्पद आहे. ही टिप्पणी स्त्रीच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करते. आयोगाला आढळले की, ही टिप्पणी भारतीय न्यायिक संहिता, 2023 च्या कलम 79 अंतर्गत येते.''

आयोगाने म्हटले आहे की, ''आयोग या अपमानास्पद टिप्पणीचा तीव्र निषेध करतो आणि मोईत्रा यांच्याविरोधात कठोर कारवाई करणार.'' एनसीडब्ल्यूने पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, मोईत्रा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावा आणि कारवाईचा तपशीलवार अहवाल तीन दिवसांत आयोगाला कळवावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT