Viral News Saam TV
देश विदेश

Viral News: चित्तथरारक! स्टंटबाजीच्या नादात कारच्या चाकाखाली आलं डोकं, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Car Stant : व्हायराल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन मुलं एका स्पोर्ट्स कारमध्ये बसले आहेत.

Ruchika Jadhav

Car Stant Video : सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळवण्यासाठी लोक कधी काय करतील याचा काही नेम नाही. लोकांनी आपल्याला पाहावे, सगळीकडे आपली चर्चा असावी असे अनेकांना वाटते. त्यामुळे या व्यक्ती स्टंट करण्याच्या नादात मोठं संकट ओढावून घेतात. यामध्ये काही अतरंगीपणा लोकांच्या जीवावर देखील बेतला आहे.

अशात अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये दोन मुलं आपल्या बाईकसोबत स्टंट करत आहेत. त्यांचा हा जीवघेणा स्टंट पाहून सगळेच थक्क झालेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन मुलं एका स्पोर्ट्स कारमध्ये बसले आहेत. यावेळी त्यांनी दोघांनीही डोक्यात हेल्मेट घातलेला नाही. तसेच कार चालवताना हे दोघे ती कार फक्त मागच्या चाकांवर उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर वाहनांची गर्दी असताना हे दोन महाशय अशा प्रकारे कार वरती उचलत आहेत.

कारचा असा स्टंट करताना अचानक कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि कार उलटी होते. त्यानंतर मागून वेगाने एक कार येत असते. ही कार समोर आल्यावर थेट या दोन्ही मुलांच्या डोक्यात शिरते. कारचे बोनेट आणि चाक यामधील अंतरात या दोन्ही मुलांचं डोकं अडकल्याचं दिसत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून दोन्ही मुलं सुखरूप आहेत. मात्र हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून यावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT