Belgaum Car Accident Photo Saam TV
देश विदेश

Car Accident News: भरधाव कार दुचाकीला धडकून झाडावर आदळली; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

Belgaum Accident News: भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Jat Jamboti Highway Car Accident

भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. थरकाप उडवणारी घटना जत-जांबोटी राज्य महामार्गावरील मुगळखोडजवळ (ता. रायबाग) शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ भीमाप्पा पडतारी (वय २२), मल्लिकार्जुन रामाप्पा मरेठे (वय १६), आकाश रामाप्पा मरेठे (वय १४), लक्ष्मी रामाप्पा मरेठे (वय १९), नागाप्पा लक्ष्मण यादवन्नावर (वय ४८), हनमंत मल्लाप्पा मल्यागोळ (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. (Latest Marathi News)

तर बाळानंद परसाप्पा माळगी (वय ३७) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार गुर्लापूरहून मुगळखोडच्या दिशेने येत होती. जत-जांबोटी मार्गावरील कार आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

यावेळी कारने समोरून जात असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकींसह कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT