Shark Attack Women Saam Tv News
देश विदेश

Woman Shark Attack: महिलेचा आगाऊपणा! शार्कसमोर फोटो काढायला गेली, विपरीत घडलं; दोन्ही हात गमावले

Shark attack at Thompsons Cove Beach: समुद्रात शार्कसोबत फोटो काढायला पर्यटक महिला गेली आणि तिच्यावर शार्कने हल्ला चढवला. यामुळे तिला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत.

Bhagyashree Kamble

शार्कसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न कॅनेडियन महिलेच्या चांगलंच अंगलटी आलंय. समुद्रात शार्कसोबत फोटो काढायला पर्यटक महिला गेली आणि तिच्यावर शार्कने हल्ला चढवला. यामुळे तिला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवारी टर्क्स आणि कैकोसमधील समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे.

द सन वृत्तानुसार, किनाऱ्यापासून काही मिटर अंतरावर सेंट्रल प्रोव्हिडन्सियलमधील थॉमसन्स कोव्ह बीचजवळ एका कॅनडियन महिलेसोबत मोठी दुर्घटना घडली. एका ५५ वर्षीय महिला शार्कजवळ फोटो काढण्यासाठी गेली. फोटोसाठी शार्कजवळ गेल्यानंतर शार्कने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेला दोन्ही हात गमवावे लागले आहेत.

महिलेवर जेव्हा शार्कने हल्ला चढवला तेव्हा तिचे कुटुंब समुद्र किनाऱ्यावर उभे होते. त्यानंतर महिलेच्या पतीने पाण्यात उडी मारली आणि शार्कला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण शार्क तिथेच फिरत होता. त्यानंतर महिलेला समुद्रकिनाऱ्यावरून बाहेर काढण्यात आले. महिलेला मदत करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील लोकांनी धाव घेतली.

महिला किनाऱ्यावर पोहोचल्यावनंतर रक्तस्त्राव थांबत नव्हते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'मी तिथे ४० मिनिटे उभा होतो. शार्कला पळवून लावल्यानंतरही शार्क तिथेच फिरत होता. हल्ला केल्यानंतरही शार्क किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करत होता. बुल शार्क असू शकतो असा अंदाज काहींनी वर्तवला आहे'.

शार्कने हल्ला केल्यानंतर तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला कॅनडाला पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. वृत्तानुसार, तिचा एक हात मनगटापासून तर, दुसरा हात कोपराच्या खालून शार्कने खाल्ला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT