Indian-Origin Businessman Darshan Singh Shot Dead in Canada Saam
देश विदेश

घराबाहेर बिझनेसमॅनला गोळ्या झाडून संपवलं; बिश्नोई टोळीचा कबुलीजबाब, नेमकं प्रकरण काय?

Indian-Origin Businessman Darshan Singh Shot Dead in Canada: कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकावर हल्ला. गोळ्या झाडून केली हत्या. बिश्नोई गँगनं सोशल मीडियावरून हत्येची जबाबदारी स्वीकारली.

Bhagyashree Kamble

भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योजक दर्शन सिंह साहसी यांची कॅनडामध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन टेक्सटाईल रिसायकलिंग व्यवासायाशी निगडीत होते. त्यांच्या फॅक्टरीमध्ये शेकडो कर्मचारी काम करीत होते. मात्र, गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगार गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या हत्येची जबाबदारी स्वीकारली.

प्राथमिक माहितीनुसार, दर्शन सिंह यांना गेल्या काही दिवसांपासून खंडणीच्या धमक्या येत होत्या. परंतु त्यांनी ही बाब गांभीर्यानं घेतली नव्हती. मात्र, घटनेच्या दिवशी दर्शन सिंह कॅनडातील घरातून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

कॅनेडियन पोलिसांनी सध्या या हत्येत कोणताही गुंड किंवा खंडणीखोरांच्या टोळीचा सहभाग नसल्याचं सांगितलं. पोलिसांचे म्हणणे आहे की, कुटुंबाने या संदर्भात कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. जुन्या वैमनस्यातून किंवा वैयक्तिक वादातून ही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दर्शन सिंह हे मूळचे पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील दोराहा भागातील रहिवासी. ते कॅनडामधील रहिवासी होते. भारतीय अमेरिकन समुदायात त्यांचा खूप आदर केला जात होता. दर्शन सिंह हे सामाजिक सेवा आणि धर्म कार्यात सक्रियपणे सहभागी होते.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगार गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडिया पोस्टमध्ये बिझनेसमॅन दर्शन सिंह यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. पोस्टमध्ये टोळीनं दावा केला की, दर्शन सिंह यांच्याकडे त्यांनी दर्शन सिंह यांच्याकडे पैसे मागितले होते. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. दर्शन सिंह यांनी बिश्नोई टोळीचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर टोळीनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

SCROLL FOR NEXT