भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या वादात भारताने कॅनडाला जशासतसं प्रत्युत्तर दिला. भारताच्या कडक भूमिकेनंतर आता कॅनडाचा सूर बदलताना दिसत आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं की, कॅनडा अजूनही भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत ही वाढती आर्थिक शक्ती असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे देखील जस्टिन ट्रुडो यांनी मान्य केले. (Latest Marathi News)
कॅनडाने पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की, 'कॅनडा आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी भारतासोबतचे संबंध मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे. जगाच्या विविध व्यासपीठांवरही भारताला महत्त्व दिले जात आहे.
भारत ही एक वाढती आर्थिक शक्ती आहे आणि जिओ पॉलिटिकली खूप महत्त्वाचे आहे. भारतासोबतचे संबंध दृढ करण्याबाबत आम्ही खूप गंभीर आहोत. सागरी धोरणासाठीही भारत महत्त्वाचा आहे. (Political News)
या वर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अलीकडेच कॅनडाच्या संसदेत आरोप केला की, त्यांच्या सरकारला निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे.
ट्रुडो यांच्या या आरोपानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आणि भारताने ट्रुडो यांचे वक्तव्य बेताल ठरवून फेटाळून लावले. यानंतर कॅनडाने एका भारतीय राजदूताची हकालपट्टी केली आणि भारतानेही प्रत्युत्तर म्हणून एका कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली. याशिवाय भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यावरही बंदी घातली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.