Wedding  saam tv news
देश विदेश

१६ वर्षाची मुलगी लग्न करू शकते का? सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

१६ वर्षाची मुस्लीम अल्पवयीन मुलगी आपल्या पसंतीनुसार लग्न करू शकते, असा निर्णय काही दिवसांपूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला होता.

Satish Daud

नवी दिल्ली : लग्न म्हटलं (Wedding) की अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. अनेकदा चोरून लपून अल्पवयीन मुलींचं लग्नही लावलं जातं. अल्पवयीन मुलीचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे. या गुन्हासाठी कठोर शिक्षेची तरतुद आहे. मात्र, १६ वर्षाची मुस्लीम अल्पवयीन मुलगी आपल्या पसंतीनुसार लग्न करू शकते, असा निर्णय काही दिवसांपूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला होता. आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (Maharashtra News)

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या मते उच्च न्यायालयाचा हा निर्णय बालविवाहाला परवानगी देणारा असून बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 चं उल्लंघन करणारा आहे.

काय आहे प्रकरण?

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 16 वर्षाची मुस्लीम मुलगी मुस्लिम पर्सनल लॉ नुसार लग्न करु शकते असा निर्णय दिला होता. या निर्णया विरोधात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर आता न्यायमुर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे. न्यायालयाने वरिष्ठ वकील राजशेखर राव यांची एमिकस क्यूरी म्हणून नियुक्ती केली आहे. (Breaking Marathi News)

एमिकस क्यूरी म्हणजे काय?

"Amicus curiae" चा अर्थ "न्याय मित्र" असा आहे, Amicus curiae हा व्यावहारिकरित्या कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही, परंतु न्यायालयाला मदत करतो. याचा अर्थ असा की जर खटल्यात पक्षकार नसेल तर त्याने न्यायालयाला कायद्याच्या आधारे निर्णय घेण्यात आणि खटल्यातील इतर बाबींची माहिती देण्यासाठी मदत करावी.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, अपघातामध्ये चौघेजण गंभीर जखमी

Roti Making Tips : पोळपाट- लाटणं न वापरता बनवा गोल चपाती, 'ही' आहे युनिक ट्रिक

स्वच्छ आणि निर्मळ मन! कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये, काकूंनी जे केले ते ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान| VIDEO

Success Story: स्वप्नपूर्ती! अवघ्या २१ व्या वर्षी मिळवली अमेरिकेत २६ लाख पॅकेजची नोकरी; शेतकऱ्याच्या लेकाचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

मध्य प्रदेशातील गुलाबी थंडी, गाव झोपेत अन् छापेमारीचा धडका, पुणे पोलिसांचे "ऑपरेशन उमरती" यशस्वी

SCROLL FOR NEXT