High Court  Saam Digital
देश विदेश

Calcutta High Court : सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हटल्यास होऊ शकते तुरुंगवारी; जाणून घ्या हायकोर्टाचा निर्णय

Calcutta High Court Latest News : याचप्रकारचा निकाल कोलकाता हायकोर्टात देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी हा निकाल दिला आहे.

Vishal Gangurde

Calcutta High Court Latest News Marathi :

अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणणे महागात पडू शकते. एखाद्या महिलेला डार्लिंग म्हटल्यास आरोपी हा लैंगिक छळाचा गुन्हेगार मानला जाऊ शकतो. या आरोपीला भारतीय दंड सहिता कलम ३५४ ए अतंर्गत तुरुंगवारी होऊ शकते. याचप्रकारचा निकाल कोलकाता हायकोर्टात देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी हा निकाल दिला आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, न्यायाधीश सेनगुप्ता यांनी म्हटलं की, आरोपी जनकची शिक्षा कायम ठेवली. कारण आरोपीने नशेत असताना महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटलं की, 'काय डार्लिंग? चलान कापायला आली आहे का?'. असं म्हटल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली.

मीडिया रिपोर्टनुसार, सेनगुप्ता यांनी म्हटलं की, '354 ए उल्लेख करत म्हटलं की, आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. रस्तावरील अनोळखी महिला असो किंवा महिला पोलीस अधिकारी... एखादा व्यक्ती त्यांना डार्लिंग बोलू शकत नाही'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आरोपी हा दारूच्या नशेत असेल, तरीही तो अनोळखी महिलेला डार्लिंग बोलू शकत नाही. त्याने खरंच म्हटलं असेल तर खूप अपमानजनक आहे. आरोपीने दावा केला होता की, या गोष्टीचा काही पुरावा नाही. मी टिप्पणी केली, त्यावेळी नशेत होतो'.

हायकोर्टाने म्हटलं की,' आरोपीने शुद्धीत असतानाही महिला अधिकाऱ्यावर टिप्पणी केली असती, तरी गंभीर गुन्हा मानला गेला असता'. 'रस्त्यावर जाणाऱ्या अनोळखी महिलेला डार्लिंग बोलणे आक्षेपार्ह बाब आहे. दरम्यान, लैंगिक छळ गुन्हा केल्या प्रकरणी आरोपीला पाच वर्षांची शिक्षा किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच या प्रकरणात आरोपीला दोन्ही शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यातला पहिला निकाल भाजपच्या बाजूने, भाजपचे ३ उमेदवार विजयी

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपला धक्का, ठाकूर यांची 'बविआ' ८५ जागांवर आघाडीवर

EPF आणि NPS च्या नियमात १० महत्त्वाचे बदल; थेट रिटायरमेंट फंडवर होणार परिणाम; वाचा अपडेट

Municipal Election Result: कुंभमेळानगरी नाशिकमध्ये काय सांगता सुरुवातीचे आकडे? मनसेच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार की धनुष्यबाण चालणार? VIDEO

Mahanagar Palika Election Result : ठाकरे बंधूंची गाडी सुसाट, मुंबईत ६० जागांवर आघाडीवर, राज्यात भाजप सुसाट, वाचा सुरूवातीचे कल

SCROLL FOR NEXT