भर चौकात तरुणीकडून कॅब चालकास बेदम मारहाण Saam Tv
देश विदेश

भर चौकात तरुणीकडून कॅब चालकास बेदम मारहाण

व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

वृत्तसंस्था

लखनऊ - उत्तर प्रदेशची Uttar pradesh राजधानी लखनऊ Lucknow मधील कृष्णानगरच्या एका चौकात तरुणीने उबर कॅब Cab चालकास बेदम मारहाण केली. हा व्हिडीओ Video सोशल मीडियावर Social Media मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये ही तरुणी उबर कॅब चालकाला मारण करत आहे.

भर चौकात ही तरुणी कॅब चालकास कान शिलात वाजवताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. जेव्हा काही लोकांनी या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मुलगी त्यांच्यावरच ओरडत असल्याचे दिसून आले.

हे देखील पहा -

याप्रकरणी आता पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावर लोकांनी पोलिसांसमोर चालकाला मारहाण केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या तरुणीवर कारवाई का केली नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

हा कॅब चालक वजीरगंजमधील सिटी स्टेशनचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आह. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री कॅब ड्राइवर लाल सिग्नल असताना अवध चौकात थांबला होता. यादरम्यान मागून येत असलेल्या तरुणीने या ड्रायव्हरच्या गाडी चालवण्यावर वाद घालण्यात भर चौकात सुरवात केली. त्यानंतर या महिलेने सरळ त्या कॅब चालकास मारहाण सुरू केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT