CA Result News: इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) आज सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनलचा निकाल जाहीर केला आहे. सीएची परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. सीएचा निकाल आज जाहीर (CA Final Result 2023 Declared) झाला असून अक्षय जैन हा देशात पहिला आहे. सीएच्या या परीक्षा मे 2023 मध्ये झाल्या होत्या. सर्व विद्यार्थी icai.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.
अहमदाबादमधील अक्षय जैन या विद्यार्थ्याने सीएच्या अंतिम परीक्षेत ८०० पैकी ६१६ गुण प्राप्त करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सीए इंटरमिजिएट परीक्षेत हैद्राबाद येथील वाय गोकुळे साई श्रीकरने ८०० पैकी ६८८ गुण प्राप्त करत पहिला क्रमांक पटकावला आहे. सीएच्या अंतिम परीक्षेला बसलेल्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांपैकी ८.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर सीएच्या इंटरमिजिएट परीक्षेत १०.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
सीएच्या अंतिम परीक्षेला देशभरातील १.४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. तर सीए इंटरमिजिएट परिक्षेला १.८ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. सीए परीक्षेत जुना अभ्यासक्रम (गट १) आणि नवीन अभ्यासक्रम (गट २) म्हणून ओळखले जाणारे दोन गट आहेत. ज्यासाठी परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्यात आल्या होत्या.
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जा.
- सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनलच्या निकालासाठी लिंकवर क्लिक करा.
- यानंतर विनंती केलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.
- यानंतर तुमच्या निकाल स्क्रीनवर दिसेल.
- आता तुम्ही निकालाची प्रिंट आउट घेऊ शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.