Bye Bye Sir! Unique Resignation Letter in three words goes viral Twitter/@MBSVUDU
देश विदेश

Bye Bye Sir! तीन शब्दांत दिला राजीनामा; वाचून हसू आवरणार नाही!

Funny Resignation Letter Goes Viral : केवळ तीन शब्दांत त्याने आपल्या नोकरीला लाथ मारली आहे. हे गंमतीशीर राजीनामा पत्र सोशल मीडियावर चांगलंचं व्हायरल (Viral) होतंयं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एखाद्या कंपनीतून, संस्थेतून आपल्या पदाचा राजीनामा देणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. राजीनामा (Resignation Letter) देण्यासाठी एक पत्र लिहावं लागतं. जिथं आपण काम करतो त्याठिकाणी आपल्या वरिष्ठांना आपण संबंधीत कंपनी, संबंधीत संस्था अथवा राजकारणात पक्षाचा जरी राजीनामा द्यायचा असेल तर शक्यतो त्यासाठीचं कारण हे आपल्या राजीनामा पत्राद्वारे सांगावं लागतं. जर ते कारण आपल्याला सांगायचं नसेल तरी तसा उल्लेख करावा लागतो. यासाठी ४ ते ५ ओळींचं राजीनामा पत्र लिहीलं जातं. पण, एका पठ्ठ्यानं केवळ ३ शब्दांत आपला राजीनामा (3 Words Resignation Letter) बॉसला दिला आहे. केवळ तीन शब्दांत त्याने आपल्या नोकरीला लाथ मारली आहे. हे गंमतीशीर राजीनामा पत्र सोशल मीडियावर चांगलंचं व्हायरल (Viral) होतंयं. (Unique Resignation Letter in three words goes viral funny comments on Maphanga Mbuso twitter)

हे देखील पाहा -

हे तीन शब्द कोणते? तर ते असे आहेत 'Bye Bye Sir'(बाय बाय सर) असे हे तीन मॅजिकल शब्द आता लोकांना खळखळून हसवत आहेत. तीन शब्दांचा हा राजीनामा कदाचित जगातला सर्वात लहान आणि कमी शब्दांचा राजीनामा असावा. Maphanga Mbuso नावाच्या ट्वीटर युजरने हा 3 शब्दांचा राजीनामा दिला आहे. या तीन शब्दांच्या राजीनाम्याचा स्क्रीनशॉट त्याने ट्विटरवर शेयर केला आहे. याला त्याने कॅप्शनही अगदी 'Simple'या एका शब्दाचं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या ट्विटला २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत तर ५ हजारांहून अधिक लोकांनी याला रिट्वीट केलं आहे. तीन शब्दांचा राजीनामा वाचून लोकांना हसू आवरत नाहीये.

या भन्नाट राजीनाम्यावर ट्विटर यूजर्सनेही फिरकी घेतली आहे. अनेकांनी गंमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. यात एका यूजरने पोस्टवर लिहिले - किमान ते अद्याप औपचारिक आहे. तर दुसर्‍याने लिहिले - हे इतके सोपे आणि सरळ आहे की कोणालाही स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. तर तिसऱ्या युजरने लिहिले- टू द पॉइंट. अशा हजारो कमेंट्सने हे पत्र अनेकांपर्यंत पोहोचलं असून यामुळे हसू आवरणं अशक्य झालं आहे. त्यामुळे तुम्हीही जर राजीनामा देण्याच्या तयारीत असाल तर एकदा हे पत्र नक्की पाहा. फक्त पाहा. असा राजीनामा दिल्यास पुढच्या दुर्घटनेला आम्ही जबाबदार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT