Haryana Accident Saam Tv
देश विदेश

Haryana Accident Video: धक्कादायक! अचानक भरधाव बसचा ब्रेक झाला फेल, ड्रायव्हरच्या समोरील काचेतून बाहेर पडले प्रवासी!

Latest News: या अपघातामध्ये (Hariyana Bus Accident) बसमधील प्रवासी हे ड्रायव्हरच्या समोरील काचेतून बाहेर पडले.

Priya More

Haryana News: हरियाणामध्ये (Hariyana) झालेल्या प्रवासी बसच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. गुरुवारी दुपारी हरियाणामध्ये बसला अपघात झाला. भरधाव प्रवासी बसचा अचानक ब्रेक फेल झाला आणि अपघात झाला. या अपघातामध्ये (Hariyana Bus Accident) बसमधील प्रवासी हे ड्रायव्हरच्या समोरील काचेतून बाहेर पडले. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. हरियाणा रोडवेजची ही बस दुपारी ३ च्या सुमारास बस स्टँडहून चिकासाठी निघाली होती. विश्वकर्मा चौकात ही बस पोहोचल्यानंतर चालकाला ब्रेक लागत नसल्याचे लक्षात आले. बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येता चालकाची चिंता वाढली.

अशामध्ये बसमध्ये असलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान दाखवले. त्याने भरधाव बसला थांबवण्यासाठी चौकामध्ये सुरु असलेल्या बांधकामाला बस धडकवली. त्यामुळे बस जागेवरच थांबली. पण बस बांधकामाला जोरात धडकल्यामुळे चालकाच्या समोरील बसची काच फुटली आणि बसमधील प्रवासी बाहेर फेकले गेले.

अपघातानंतर रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यांनी जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर बसचे मोठे नुकसान झाले. बसचा टायर निघाला होता आणि पेट्रोलची गळती होऊ लागली होती. अशामध्ये स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले आणि जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा तपास हरियाणा पोलिसांकडून सुरु आहे. अपघाताची ही घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मित्र-शत्रू-मित्र, 5 वर्षांचं चित्र; महाराष्ट्रातल्या राजकारणाची 10 धक्कादायक वळणं, पाहा व्हिडिओ

Abhinav Arora : अभिनव अरोरा किती आहे कृष्ण भक्त? झालं लाईव्ह टेस्ट, उत्तर ऐकून चकीत व्हाल

Alibaug News: रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस; मालक कोण? ऐन निवडणुकीत अलिबागमध्ये घडलेल्या प्रकाराने खळबळ

India-China Disengagement : सीमेवरचं टेन्शन मिटलं, चीनचं सैन्य मागे हटलं; शेजारी देश पुन्हा गस्त घालणार

Pune Firing : ऐन दिवाळीत पुण्यात तिघांकडून गोळीबार; तर नवी मुंबईतील उलव्यात स्फोटांचे आवाज, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT