Nirmala Sitaraman Union Budget
Nirmala Sitaraman Union Budget  Saam Tv
देश विदेश

Union Budget 2023: तुमचं ड्रिम होम आता होणारचं!अर्थसंकल्पात मोठी घोषणा; PM आवास योजनेसाठी भरघोस तरतूद

Gangappa Pujari

India Budget On Dream Home: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थमंत्री म्हणून आपला पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकार किती पैसे खर्च करणार हे या अर्थसंकल्पात सांगितले. यामध्ये मोदी सरकारने गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे.

मोदी सरकारने (Modi sarkar) गरिबांना खुशखबर दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या बजेटमध्ये 66% वाढ करण्यात आली आहे. याबद्दल अर्थमंत्री म्हणाल्या की, "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे."

त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी,"आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी उपलब्ध करून देणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि समष्टि आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे. 'पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​जाईल," असेही सांगितले आहे.

मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. त्याचबरोबर शेतीशी संबंधित स्टार्टअप्सनाही प्राधान्य दिले जाईल. तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अग्रीकल्चर एक्सीलरेटर फंडाची स्थापना केली जाईल. असेही अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

Sleeping Time: दिवसाला किती तास झोप घ्यावी?

Beetroot Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा; रंग पाहून लहान मुलं देखील ताव मारतील

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT