Young Man Drowns in Dam Water in Bhopal, Madhya Pradesh SAAM TV
देश विदेश

Young Man Drowns : UPSC ची तयारी करणाऱ्या इंजिनीअर तरुणाचा बुडून मृत्यू, मैत्रिणीच्या कुत्र्याला वाचवायला उतरला होता धरणात

Saam TV News

Bhopal, Madhya Pradesh News :

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. धरणात पडलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या उच्चशिक्षित तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. बीटेकमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर त्याच्या पालकांनाही मोठा मानसिक धक्का बसला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भोपाळमध्ये (Bhopal News) बुधवारी सकाळी ही हृदय हेलावणारी घटना घडली. मैत्रिणीने कुत्रा पाळला होता. तो कुत्रा धरणाच्या पाण्यात पडला. तो बुडेल म्हणून त्याला वाचवण्यासाठी हा २३ वर्षीय तरूण जीवाची पर्वा न करता धरणाच्या पाण्यात उतरला. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. सरल निगम असं या दुर्दैवी तरुणाचं नाव होतं. धरणात पडलेला कुत्रा पोहून सुखरूप बाहेर आला.

सरल हा घरातला एकुलता एक मुलगा होता. MANIT मधून अभियांत्रिकी पदवीचं (Engineering Degree) शिक्षण घेतल्यानंतर तो यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

२ मैत्रिणींसोबत फिरायला गेला होता

पोलिसांच्या माहितीनुसार, सरल हा मित्रांसोबत जंगल कॅम्पमध्ये (Jungle Camp) गेला होता. बुधवारी सकाळी साधारण साडेसात वाजताच्या सुमारास तो दोन मैत्रिणींसोबत केरवा धरण परिसरात वॉकसाठी (Morning Walk) गेला. एका मैत्रिणीनं तिच्यासोबत पाळीव कुत्राही नेला होता. धरणाच्या खालच्या बाजूस हे तिघे जण फिरत असताना कुत्रा (Dog) पाण्यात पडला. कुत्र्याला वाचवण्यासाठी या तिघांनी साखळी पद्धतीने हात धरून पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला.

तिघांनी कुत्र्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि तिघेही पाण्यात पडले. त्याच्या दोन मैत्रिणी कशाबशा पाण्याच्या बाहेर आल्या. पण सरल हा खोल पाण्यात बुडाला. (Young Man Drowned) मैत्रिणींनी जवळच असलेल्या रस्त्याकडे धाव घेतली आणि मदतीसाठी आरडाओरड केली. जंगल कॅम्पमध्ये कार्यरत असलेला सुरक्षारक्षक घटनास्थळी धावून गेला. त्याने रतिबाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

काही वेळाने पोलीस हे डायव्हर्स आणि एसडीईआरएफच्या (SDERF) जवानांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत सरल पाण्यात बुडाला होता. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. तासाभरानंतर सरलचा मृतदेह सापडला. दहा ते पंधरा फूट खोल पाण्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.

सरलच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. सरलसोबत असलेल्या मैत्रिणी (Friends) त्याच्या घराजवळच राहतात. त्यांना घरी सुखरूप सोडण्यात आले आहे. त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT