Barabanki Crime News Saam Tv
देश विदेश

Barabanki News: बहिणीचं शीर छाटलं, हातात घेऊन ८०० मीटरपर्यंत गावभर फिरला; एवढा क्रूर का झाला भाऊ?

Brother Killed Sister In Barabanki: प्रेम प्रकरणाच्या रागातून भावाने हे संतापजनक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये 'सैराट'सारखी धक्कादायक घटना घडली. भावाने बहिणीची हत्या करुन तिचे शीर धडावेगळे केले. ऐवढ्यावरच न थांबता बहिणीचे शीर हातामध्ये घेऊन तो गावभर फिरला. या घटनेमुळे बाराबंकीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी भावाला अटक केली. प्रेम प्रकरणाच्या रागातून भावाने हे संतापजनक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही घटना फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिठवारा गावामध्ये घडली आहे. शुक्रवारी सकाळी २४ वर्षीय रियाजचे बहिणीसोबत काही कारणावरून वाद झाला. वाद झाल्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर तो घरी परत आला आणि त्याने बहिणीला कपडे धुण्यास सांगितले. रियाजची बहीण कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली आणि पाणी भरू लागली. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या रियाजने बहिणीवर धारधार शस्त्राने वार केले.

रियाजने रागाच्या भरात बहिणीचा गळा चिरला. त्यानंतर त्याने बहिणीचे शीर धडावेगळे केले. रिजाय ऐवढ्यावरच न थांबता तो बहिणीचे शीर हातामध्ये घेऊन रस्त्यावरुन ८०० मीटरपर्यंच चालत गेला.पोलीस ठाण्याच्या दिशेने बहिणीचे शीर हातात घेऊन चालणाऱ्या रियाजला पाहून गावकऱ्यांना धक्का बसला. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. त्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रियाजला अटक केली. पोलिसांनी रियाजच्या बहिणीचे शीर आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे. बहिणीची हत्या केल्यानंतरही रियाजच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता.

रियाजच्या शेजारी राहणाऱ्याने सांगितले की, 'रियाजची बहीण तिच्या प्रियकरासोबत गावातून पळून गेली होती. 29 मे रोजी कुटुंबीयांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी रियाजची बहिण आणि तिच्या प्रियकराला गावाबाहेरून पकडले होते. पोलिसांनी तरुणाची रवानगी तुरुंगात केली होती. तर रियाजच्या बहिणीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते.'

रियाजला त्याची बहीण अजिबात आवडत नव्हती. या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. शुक्रवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रियाजने टोकाचे पाऊल उचलत बहिणीची हत्या केली. रियाज गावात भाजीचा स्टॉल लावतो. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. जेव्हा त्याची बहीण तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तेव्हा रियाज एका प्राणघातक हल्ल्याशीसंबंधित प्रकरणात तुरुंगात होता. 15 दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT