brides changed Saam Tv
देश विदेश

अरेरे, लाईट गेली अन् अनर्थ घडला; लग्नाच्या मंडपात बायकाच बदलल्या

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात वीज गेल्याने एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे अंधारामुळे लग्नसमारंभात वधू-वर बदलले गेले अन् लाईट आल्यावर पाहिलं तर काय...

वृत्तसंस्था

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात वीज गेल्याने एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे अंधारामुळे लग्नसमारंभात वधू-वर बदलले गेले अन् लाईट आल्यावर पाहिलं तर काय... ते चित्र पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

झाले असे की, जिल्ह्यातील इंगोरिया पोलीस ठाण्याच्या अस्लाना गावात रमेशलाल यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे लग्न झाले होते. रविवारी त्यांच्या दोन मुली निकिता आणि करिश्मा यांचा डांगवाडा येथील भोला आणि गणेश यांच्याशी विवाह झाला. दोन्ही तरुण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. वरात आल्यानंतर, रात्री 11.30 च्या सुमारास माता पूजनाच्या विधीदरम्यान दोन्ही नववधूंनी वेगवेगळ्या वरांचे हात धरून पूजा केली.

यावेळी निकिताने गणेश आणि करिश्माने भोलाचा हात धरला. दुपारी 12.30 च्या सुमारास लाईट आली तेव्हा वधू आणि तिचे कुटुंबीय दोघेही चक्रावून गेले. मात्र, ही चूक नंतरच्या फेऱ्यांनंतर दुरुस्त करण्यात आली.

गावात दररोज वीजपुरवठा खंडित (Electricity Cut) होत असतो असे नातेवाइकांनी सांगितले. एवढेच नाही तर ही अनेक तास वीज जाते. त्यामुळे विवाह सोहळ्यात वधू-वरांची आदलाबदल झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IBPS Recruitment : सरकारी बँकांमध्ये मेगाभरती; ११००० पदे, अर्ज कसा कराल, महाराष्ट्रात किती पदे?

Tehseen Poonawalla: 'माझ्या घरावर पोलिसांची धाड, मला नजरकैदेत ठेवलं'; E-20 विरोधात उपोषणाआधीच तहसीन पुनावालांचा गंभीर आरोप

Maharashtra News Live: डोवालांच्या टिप्समुळे १३ बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा - अमित शहा

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT