Andhra Pradesh News Saam Digital
देश विदेश

Andhra Pradesh News: लग्न मंडपात तुफान राडा, प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला कुटुंबियांनी फरफटत नेलं; VIDEO व्हायरल

Andhra Pradesh Viral Video: लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच कधी नवरदेवाच्या हट्टापायी लग्न मोडतं, तर कधी वऱ्हाडी मंडळींना जेवण न मिळल्याने लग्नात राडा होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच कधी नवरदेवाच्या हट्टापायी लग्न मोडतं, तर कधी वऱ्हाडी मंडळींना जेवण न मिळल्याने लग्नात राडा होतो. अनेकदा प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या कुटुंबियांची लग्नमंडपात एन्ट्री होते अन् मोठा गोंधळ उडतो. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातून समोर आला आहे. प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणीला चक्क कुटुंबियांनी लग्नमंडपातून फरफटत नेलंय.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कडियामधील घडलाय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, साधारण चार-पाच तरुण लग्नाच्या मंडपातून नवरीला त्यांच्यासोबत जबरदस्तीने घेचून घेऊन जात आहेत.

या घटनेत नवरदेवाच्या कुटुंबियापैंकी तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या तरुणांनी त्यांच्या डोळ्यांवर मिरची पावडर टाकली. तरुणी मदतीसाठी ओरडत होती. मात्र तिला घेऊन जाणाऱ्या तरुणांनी कशाची भीती न बाळगता तिला तेथून घेऊन गेले.

या घटनेप्रकरणी नवदेवाच्या कुटुंबीयांनी त्या तरुणांविरुद्ध अपहरणाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एक तरुणीचं आपल्याच कॉलेजमधील एका तरुणावर प्रेम जडलं होतं. शनिवारी (ता. १३) दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.

ठरल्यानुसार, प्रेमी युगुलाने विजयवाडा येथील एका मंदिरात लग्न केले. लग्नानंतर तरुण तिला घेऊन घरी गेला. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी दोघांचे औपचारिक पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले. लग्नात सर्व नातेवाईकांना बोलवण्यात आले. यामध्ये तरुणीच्या कुटुंबियांनाही निमंत्रण देण्यात आलं.

मात्र, जेव्हा तरुणीचे कुटुंबिय लग्नमंडपात पोहचले. तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला. कशाचा विचार न करता तरुणीच्या कुटुंबियांनी लग्न मंडपात गोंधळ घातला. या घटनेत नवरदेवाच्या कुटुंबियातील एक सदस्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

SCROLL FOR NEXT