Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: हौस पडली महागात! घोड्यावर उभ राहून नाचताना नवरीचा घसरला पाय अन् दोघेही... भर वरातीत झाली फजिती; VIDEO तुफान VIRAL

Viral Wedding Video: नाचताना नवरीचा पाय घसरला आणि ती घोडीवरून नवरदेवासोबत जोरात खाली पडली.

Gangappa Pujari

Viral Video: लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. दोन जिवांच्या नव्या आयुष्याची, नव्या प्रवासाची सुरूवात करुन देणारा हा शुभप्रसंग असतो. त्यामुळेच प्रत्येकजण आपल्या लग्नाची खास तयारी करत असतो. लग्नातील प्रत्येक गोष्ट हटके करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.

मात्र अनेकदा लग्नात हटके करण्याच्या नादात अशी घटना घडते, ज्यामुळे सर्वांसमोर चांगलीच फजिती होते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही पोटधरुन हसाल, काय आहे या व्हायरल व्हिडिओची कहाणी चला जाणून घेवू...

वधू आपल्या मजेदार कृत्यांमुळे लोकांना खळखळून हसवतात. पण कधी कधी छोट्या चुका त्यांना महागात पडतात. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये एक वधू चांगलीच जखमी झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वरातीच्या मध्यभागी एक नवरदेव घोडीवर बसलेला दिसत आहे. लोक त्याच्या आजूबाजूला आनंदाने नाचताना दिसत आहेत. बॅकग्राउंडमध्ये बॅण्ड वाजवण्याचा आवाजही येत आहे. दरम्यान नवरीदेखील तिथे उपस्थित आहे.

मात्र काही वेळाने नवरदेव ज्या घोडीवर बसलेला असतो, त्याच घोडीवर वधूही बसते आणि थोड्याच वेळात ती स्वतः घोड्यावर उभी राहते. यानंतर ती बँड बाजाच्या तालावर नाचू लागते. वधू घोडीवर उभी राहून नाचत असल्याचं पाहून लोक खूप आनंदी होतात. पण पुढच्याच क्षणी भलतंच काहीतरी घडतं. नाचताना नवरीचा पाय घसरला आणि ती घोडीवरून नवरदेवासोबत जोरात खाली पडली.

व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून नवरा नवरीची चांगलीच फजिती केली आहे. एका यूजरने लिहिलं की, घोडीच्या वर चढण्याची गरज नव्हती, जर तुम्हाला नाचायचं असेल तर तुम्ही खाली नाचू शकले असते. हा व्हिडिओ केव्हाचा आणि कुठला आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही, मात्र तो व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर, वाचा

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT