Electoral Bond Case Saam Tv
देश विदेश

Electoral Bond Case: SBIला सुप्रीम कोर्टाने पुन्हा फटकारलं! इलेक्टोरल बाँडवरुन प्रश्नांची सरबत्ती; २१ मार्च शेवटची डेडलाईन

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १८ मार्च २०२४

Supreme Court On Electoral Bonds:

इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी पार पडली. मागच्या सुनावणीत इलेक्ट्रोल बॉडचा युनिक नंबर का दिला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय़ला नोटीस पाठवली होती. आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला पूर्ण माहितीचा खुलासा करायला सांगितला होता, पूर्ण माहिती का दिली नाही ? असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.

आजच्या सुनावणीत काय घडलं?

"तुम्हाला पूर्ण माहितीचा खुलासा करायला सांगितला होता. एसबीआयने पूर्ण माहिती का दिली नाही? तुम्हाला काय हव ते सांगा आम्ही तेवढीच माहिती ओपन करू अशी एसबीआयची वृत्ती दिसते, असे म्हणत तुम्ही फक्त कोर्टाच्या आदेशावर अवलंबून राहू नका, तुम्ही राजकीय पक्षाच्या युक्तीवाद करायला आलेले नाहीत, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने स्टेट बॅंकेकडून युक्तीवाद करणाऱ्या ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना फटकारलं.

यावर "आम्ही माहिती द्यायला तयार आहोत. मात्र आमची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने बाहेर रंगवली जात आहे. आम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जातं आहे. माध्यमांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे," असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं?

एसबीआयचे चेअरमन यांना गुरुवारी म्हणजेच 21 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. सोबतच याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सुप्रीम कोर्टात सादर करावे लागणार आहे. SBIला उपलब्ध सर्व तपशील द्यायला हवेत यात शंका नाही. आम्ही स्पष्ट करत आहोत की बाँड नंबरदेखील नमूद करावा लागेल, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT