Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा; पक्षफोडीच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचं ओपन चॅलेंज

Sanjay Raut On Devendra Fadnavis : थोडा वेळ लागला पण मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. मी फार संयमी व्यक्ती आहे. मात्र योग्य वेळी उत्तर द्यावच लागतं, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे गटावर निशाणा साधला होता.
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Devendra Fadnavis Vs Sanjay RautSaam TV
Published On

Sanjay Raut Press Conference:

ज्या दिवशी आमची सत्ता येईल त्यावेळी फडणवीसांनी पुन्हा हे वाक्य बोलून दाखवावं. मात्र त्यावेळी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. लोहा लोहे को काटता हे आम्हाला देखील माहित आहे त्यांनाच माहिती असे नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

काल मुंबईत राहुल गांधींची सभा असतानाच "काँग्रेस न होती तो क्या होता" या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मी पुन्हा येईल या वाक्याचा पुनरुच्चार केला. मी पुन्हा येईल म्हटलो होतो. थोडा वेळ लागला पण मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. मी फार संयमी व्यक्ती आहे. मात्र योग्यवेळी उत्तर द्यावंच लागतं, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे गटावर निशाणा साधला होता.

त्यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुढे म्हटलं की, ज्या दिवशी आमच्या हाती केंद्राची सत्ता ईडी आणि सीबीआयसह येईल त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा, असं थेट ओपन चॅलेंज राउतांनी केलं आहे.

दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष

भाजप दुसऱ्यांची पोरं पळून मोठा झालेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष. स्वतःची पोरं नाहीत. सर्व फोडलेली पोरं आमची ते घेऊन ते बसले आहेत. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका ते पुन्हा पळून जातील, असा इशारा देखील संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

भारतीय जनता पार्टी भरष्टाचार पार्टी

भ्रष्टाचारला समर्पण देणारी पार्टी आणि भ्रष्टाचार काम करणारी पार्टी ही भाजपची ओळख आहे. ते आरशात बघितलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसणार. मी 15 दिवसांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन जुगार पार्टी सुरू आहे. त्याच्यावर बंदी आणावी त्या जुगारामध्ये महाराष्ट्रातील तरुण मुलं बिघडत आहेत. मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही, असंही राऊतांनी भाजपवर टीका करताना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com