Nitish Kumar Saam Digital
देश विदेश

Nitish Kumar News: 'जेडीयू'मध्ये मोठी उलथापालथ, लल्लन सिंह यांचा राजीनामा; नितीश कुमार पक्षाचे नवे अध्यक्ष

Nitish Kumar New JDU Chief:: जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्यानंतर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नितीशकुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. २९ डिसेंबर २०२३

Nitish Kumar News:

आगामी लोकसभा निवडकीच्या आधी जनता दल युनायडेट पक्षात मोठा बदल झाला आहे. राजधानी दिल्लीत आयोजित जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्यानंतर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नितीशकुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणूकांच्या (Loksabha Election 2024) दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच बिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या जेडीयूमध्ये (Janata Dal United) मोठा बदल करण्यात आला आहे. जनता दल युनायटेडच्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये जनता दल युनायटेडच्या (JDU) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांनी राजीनामा दिला. ज्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये (India Aaghadi) पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून कोणाचे नाव येणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. इंडिया आघाडीमधील अनेक बडे नेते यासाठी इच्छुक आहेत. ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. या चर्चा सुरू असतानाच जेडीयूमध्ये मोठा बदल करण्यात आला असून नितीश कुमार यांची पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT