मुंबईत नायलॉन मांजाने गळा चिरून पोलिसाचा बळी गेल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये नायलॉन मांजावर बंदी असताना बेकायदा विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. अंबड पोलिसांनी ६० हजार रुपये किंमतीचा मांजा जप्त केला आहे. तसेच विक्रेत्याला अटक केली आहे.
नाशिकमध्ये नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली होती. तरीही छुप्या पद्धतीने मांजाची विक्री सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. (Latest News)
नाशिक पोलिसांनी २३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी घातली आहे. नायलॉन मांजा वापरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांची ही पहिली मोठी कारवाई आहे. अंबडमध्ये पोलिसांनी तब्बल ६० हजार रुपये किंमतीचा १५० गट्टू नायलॉन मांजा जप्त केला आहे. मांजा अवैधपणे विकणाऱ्यालाही अटक केली आहे.
मांजावर बंदी
मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवले जातात. पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरल्याने माणासांना, प्राण्यांना आणि पक्ष्यांना इजा होते. तसेच अनेक अपघाताच्या घटना देखील घडतात. त्यामुळे पोलिसांनी नायलॉन मांजावर बंदीचा निर्णय घेतला आहे.
या काळात नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांदा मांजा वापरताना दिसल्यास हद्दपार किवा तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहनही नाशिक पोलिसांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.